STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Abstract Children Stories Inspirational

3  

Sumit Sandeep Bari

Abstract Children Stories Inspirational

संस्कृती की चमत्कार

संस्कृती की चमत्कार

2 mins
575

     एक व्यक्ती केमिकल लॅबोरेटरी मध्ये काम करत असे, त्याचे नाव राम होते. त्याच्या लॅबोरेटरी मध्ये एक प्रयोग चालू होता व त्यासाठी लॅबोरेटरी रात्री ०९ ते सकाळी ११ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवावी लागत असे. लॅबोरेटरीत प्रयोग चालू असल्यामुळे बंद वेळेत लॅबोरेटरीत ऑक्सीजन बंद असायचा.

        राम येता जाता लॅबोरेटरीबाहेरील सेक्युरिटी गार्डला राम राम करत असे. वार बुधवार रात्रीचे ०८:४५ झाले, सर्वजण घरी निघण्याची तयारी करत होते. ०९ वाजले व सर्वजण घरी जायला निघाले, रामला मात्र लॅबोरेटरीतून काही आवाज येऊ लागले होते. राम ते बघण्यासाठी परत लॅबोरेटरीत गेला, सर्वजण बाहेर निघाले हे समजून तेथील एकाने सर्व लाईट बंद केले व ऑक्सीजन देखील बंद केला. राम मात्र तेथेच अडकून राहिला.

         ऑक्सिजन बंद झाल्यामुळे रामचा श्वास कोंडू लागला, त्याला आता विश्वास झाला की माझे मरण आले आहे. पण दहा मिनिटातच ऑक्सीजन चालू झाला व लॅबोरेटरीचा दरवाजा उघडला. रामला वाटले जणू काही चमत्कारच झाला, समोर हातात टॉर्च घेऊन सेक्युरिटी गार्ड आला व रामला बाहेर घेऊन गेला. राम म्हणाला आपणास कसे ठाऊक मी इथे अडकलो आहे? गार्ड उत्तरला साहेब तुम्ही रोज मला सकाळ संध्याकाळ राम राम करत जातात. आज सकाळी तुम्ही मला राम राम केले पण जातांना तुम्ही मला दिसलेच नाहीत, मला काहीतरी चूक वाटले, म्हणून मी आलो.

         रामला माहीतदेखील नव्हते की एका व्यक्तीला दिलेल्या छोट्याश्या सन्मानामुळे आज त्याचा जीव वाचू शकला.


तात्पर्य :- जेव्हाही कोणाला भेटाल तेव्हा कमीत कमी त्या व्यक्तीशी हसा व शक्य झाले तर २ मिनिटे उभे राहून बोला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract