अर्धवट ज्ञान धोकादायक असते
अर्धवट ज्ञान धोकादायक असते
अर्धवट ज्ञान कधीही धोका दायक. तर कष्ट आणि वेळेनुसार मिळालेले ज्ञानामुळे आपण योग्य आणि चुकीच्या गोष्टी समजू शकतो. एकेकाळी एक हिरे व्यापाऱ्याच्या मृत्यू नंतर त्याच्या मुलावर कुटुंबाची जबाबदारी पडली होती. त्याचा व्यापार बंद झाला होता. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खराब होती. एके दिवशी मुलाला घरात एक हिऱ्याचा हार सापडला. त्याला हिऱ्याची अर्धवट ज्ञान होत, त्याला वाटले की, हा किमती हार आहे. तो हार घेऊन त्याच्या काकाकडे गेला. त्याचे काका देखील हिऱ्याचे व्यापारी होते. काकांनी हिऱ्याला पारखला आणि त्याला म्हणाले की, हा हार सध्या विकू नकोस. कारण सध्या व्यापारत मंदी आहे. कालांतराने विकशील तर त्या हारची चांगली किंमत मिळेल. तोपर्यंत तू माझ्या दुकानावर काम कर. यामुळे तुझ्या घराचा उदर्निवाह होईल.
काकाने सांगितल्याप्रमाणे मुलाने त्यांच्या दुकानावर काम करण्
यास सुरुवात केली. कालांतराने त्याला हिऱ्यांची चांगली ओळख होत गेली. त्याला खरा आणि खोटा हिरा लगेच ओळखता येत होता. सोबतच त्याच्या घरची परिस्थिती सुद्धा सुधारू लागली होती. जेव्हा त्याला बाजारात चांगला धंदा दिसला तेव्हा त्याने हिऱ्याचा हार विकण्याचा विचार केला.
मुलगा घरी गेला आणि हार काढून पाहिला असता तो हार खोटा असून त्याची काहीच पैसे येणार नसल्याचे त्याला माहीत झाले. त्यानंतर तो लगेच आपल्या काकाकडे गेला.
काका त्याला म्हणाले, हा हार खोटा असल्याचे मला त्याच दिवशी समजले होते. पण मी जर तुला त्या दिवशी सांगितले असते तर तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता. तू मला चुकीचे समजला असता. तुला वाटले असते की, मला हा हार तुझ्याकडून घ्यायचा आहे. आज तू स्वतः हिऱ्यांना ओळखू शकतोस. खरे आणि खोटे हिरे कोणते हे तुला माहीत आहे. यासाठी मी तुला माझ्याकडे कामाला ठेवले होते.