Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

सुमित संदीप बारी

Others

5.0  

सुमित संदीप बारी

Others

बदलत्या काळातील शब्दांचे अर्थ

बदलत्या काळातील शब्दांचे अर्थ

1 min
252


आमच्या वडिलांच्या शिक्षणाच्या वेळी


Window म्हणजे एक खिडकी होती

आणि

Applications म्हणजे कागदावर लिहिलेला विनंती अर्ज होता

जेव्हां Keyboard म्हणजे पियानो

आणि

Mouse म्हणजे फक्त उंदीरच होता...

जेव्हां File ही कार्यालयातील 'एक महत्वाची वस्तू' होती...

आणि

Hard Drive म्हणजे महामार्गावरील वरील एक

जिकिरीचा वाहन प्रवास होता

जेव्हां Cut हे चाकूने किंवा धारदार शस्त्राने करत होते

आणि

Paste हा डिंका ने करत होते

जेव्हां Web म्हणजे कोळ्याचे जाळे होते

आणि

Virus ने फक्त तापच येत होता

जेव्हां Apple आणि Blackberry ही केवळ

फळेच होती


आता वरील सर्व शब्द ही फक्त प्रत्यक्षातील वस्तूच राहिल्या नाहीत तर सर्व मोबाईल, कम्प्युटर व लॅपटॉप यासारख्या वस्तूंमधील वस्तू झाल्या आहेत.


त्यावेळी आपल्याकडे कुटुंबासाठी आणि मित्र-मैत्रिणींसाठी भरपूर वेळ होता


पण आता शब्दांचे अर्थ बदलले आणि माणसंही बदललीत आणि माणसांचा आपल्या व्यक्तींसाठी असलेला वेळही संपला...


Rate this content
Log in