धनु कोष्ठक - २१
धनु कोष्ठक - २१
लेखक: सिर्गइ नोसव : भाषांतर : आ
11.02
मुख्य गोष्टीपर्यंत पोहोचू नाही शकणार.”
माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी, मोट्ठा बो-टाय लावलेला, आणि एकंदर सम्माननीय व्यक्तिमत्व असलेला, माइक्रोफोन काबीज करतो.
“मी बहुमताच्या विचारांनी अंशतः आणि पूर्णतः सहमत आहे, पण, आपल्याला ह्या अत्यंत वैयक्तिक प्रकाराच्या समस्या कां उद्विग्न करतात आहेत? जरा बघा, की देशांत काय चाललंय. आणि ग्रहावर? आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतरात्म्यांत. काल तुम्हीं मला आपली गोष्ट पूर्ण करू दिली नाही, म्हणून मी आज म्हणतोय. तुम्हांला प्रचलित वैधानिकतेच्या बारकाव्यांची फिकर आहे, जेव्हां मानवता आपल्याच प्रकारचं जीवन जगते आहे! असं कसं शक्य आहे? जर समस्येकडे व्यवस्थेच्या उंचीवरून बघितलं, तर आपल्याला कळतं की आपल्या व्यवस्थेला, मग ती कितीही प्रभावशाली कां न असो, एक वस्तू जगू नाही देत आहे : कागदपत्रांचा अनियंत्रित प्रवाह. आणि निरंतरतेसाठी आपल्याला ह्याच्याशी लढा द्यावा लागेल!”
“ठीक आहे,” अध्यक्ष सहमति दाखवतो, पण, बोललेल्या प्रत्येक मुद्द्यावर नाही.
“कागदपत्रांचा प्रवाह, आपल्या कार्यक्षेत्रांत नाहीये. बसून जा.”
“मी बसतो!” माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी म्हणतो आणि आपल्या जागेवर बसतो. “मी बसलो. पण तरीही आपलं! आपलं कार्यक्षेत्र! आपलं!”
“मित्रांनो, चार्टरच्या ड्राफ्टकडे वळू या,” अध्यक्ष व्यस्ततेच्या भावाने कागदपत्रांची उलटापलट करंत म्हणतो. “ह्याचा मजकूर तुमच्या हातांत आहे, तुम्हीं त्याच्याशी परिचित आहांत. आपल्या गिल्डच्या चार्टरला मंजूर करायचा प्रस्ताव ठेवतोय. कोण ह्याच्या पक्षांत आहे? कोण विरोधांत? कोण गैरहजर आहे? एकमताने.”
काही क्षण हॉलमधे शांतता राहिले, मग एक दोन टाळ्या ऐकू आल्या, बस, ह्याच्यापेक्षां जास्त काहीच नाही.
अचानक कोणीतरी ओरडतं:
“ही जादूची ट्रिक आहे!”
“काही ट्रिक-ब्रिक नाहीये!” अध्यक्ष गरिमापूर्वक म्हणतो, त्याला स्वतःलापण विश्वास नव्हता, की हे इतक्या सहजपणे होईल.
“ही ट्रिक आहे! कृपा करून ह्याची मिनिट्समधे नोंद करण्यांत यावी!”
अध्यक्ष आपल्या बाह्या दाखवंत हात वर उचलतो. त्याच्यासाठी टाळ्या वाजतांत.
“आणि आता – बोर्डाची निवडणूक!” अध्यक्ष घोषणा करतो. चार्टर प्रमाणे बोर्डांत सात सदस्य असतील. कृपा करून गुप्त रेटिंगच्या वोटिंगसाठी नामांकन प्रस्तुत करावे.”
मीटिंगमधे उत्तेजना पसरली. काही लोक हल्ला करतात आहेत, काही नामांकन देताहेत, मग तेसुद्धा हल्ला बंद न करता नामांकन प्रस्तुत करू लागतात. बोर्डाच्या सदस्यतेच्या गुप्त रेटिंगच्या वोटिंगसाठी नामांकन प्रस्तुत करण्याच्या प्रक्रियेला थांबवणं आता अशक्य आहे. कॉन्फ्रेन्सद्वारे एकानंतर एक बारा नामांकन प्रस्तुत करण्यांत आले, आणि तेराव्या नामांकनासाठी ‘तलाव’ कपितोनवच्या उमेदवारीचा प्रस्ताव प्रस्तुत करतो.
“व्हाट द हेल!” कपितोनव वळतो, पण ‘तलाव’ हाताने खुणावून सांगतो की सगळं ठीक आहे, तापण्याची गरज नाहीये.
“फक्त आपलं नाव परंत नका घेऊ,” डावीकडे बसलेला शेजारी कपितोनवच्या कानांत कुजबुजतो. “ ‘तलाव’ला माहीत आहे की तो काय करतोय.”
“अरे, मला बोर्डांत काम करायचं नाहीये!”
“तुम्हांला कोणी निवडणार नाहीये, काळजी नका करू. हा अत्यंत हुशारीने खेळलेला डाव आहे.”
अध्यक्ष उमेदवारांच्या नावांची सूची वाचू लागतो, पण एका मोट्ठ्या किंचाळीमुळे पूर्ण न वाचतांच थांबतो :
“माझं घड्याळ! माझं घड्याळ हरवलंय!”
तो दुर्दैवी कुणीही असला, तरी सगळ्यांत आधी लोकांना त्याचा नाही, तर वेळेचा विचार येतो: किती वाजलेत? डेलिगेट्स चुपचाप आपल्या डाव्या हाताच्या मनगटाकडे बघू लागतात.
11.29
“माझं घड्याळ कुठे आहे?”
“माझंपण!”
कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष मुठींनी टेबलाचा आधार घेत हळूंच उठतो, आपल्या शरीराला पुढे वाकवून म्हणतो:
“ह्या काय ट्रिक्स आहे, मित्रांनो? काल जेव्हां मी प्रसन्न वातावरण राखण्याची विनंती केली होती, तेव्हां माझं तात्पर्य अगदी वेगळंच होतं. ते, जे तुम्हीं आता करता आहांत, हे आपल्या कौशल्याला कलंकित करतंय!”...
“हा डिवचतोय!” लोक आपापल्या जागेवरून ओरडतात.
“कॉन्फ्रेन्सला वाया जाऊ देणार नाही!”
कपितोनव घड्याळ नाही बांधंत, त्याच्यासाठी मोबाइल फोनंच पुरेसा आहे, पण सौभाग्याने मोबाइल आपल्या जागेवरंच आहे.
“ज्याचं घड्याळ हरवलंय, त्याने कृपा करून आपला हात उंच करावा,” अध्यक्ष कॉन्फ्रेन्सला संबोधित करतो.
“कृपा करून लक्ष द्या,” माइक्रोमैजिशियन झ्दानव म्हणतो, “फक्त त्यांचंच नुक्सान झालेलं आहे, ज्यांना उमेदवार म्हणून पुढे केलं होतं! – गिल्डच्या बोर्डासाठी!...सिद्ध करा की मी चुकतोय! पण, जर माझ्या कयास बरोबर असेल, तर ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे!”
“ही राहिली घड्याळं!” वस्तू शोधणारा मिखाइल श्राम ओरडतो, आणि सगळे तिकडे बघतात, जिकडे श्राम खूण करतोय: खिडकीच्या चौकटीवर पाच लिटर्सचा ‘पवित्र झरा’ पाण्याचा कैन ठेवलेला आहे, आणि त्याच्या तळाशी – घड्याळं.
त्यांचे संभावित मालक लगेच खिडकीकडे धावतात.
“चला, शाबास!” हॉलमधून एक आवाज.
“शाबास, शाबास!”
“काही ‘शाबास-बीबास’ नाही! शेम!”
“कोणी तरी खूप तीव्रतेने,” अध्यक्ष दुःखाने म्हणतो, “आपल्या मीटिंगला बर्बाद करायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो मी तुम्हांला शांत राहण्याची आणि व्यवस्था ठेवण्याची विनंती करतो! आपली एकता कायम ठेवा! वास्तवाची जाणीव असूं द्या!”
‘पवित्र झ-याच्या’ तळातून निघालेली घड्याळं पुन्हां आपापल्या मालकांकडे पोहोचतांत.
हॉलमधून ऐकू येतं “सैबटाझ”.
कपितोनवच्या कानांत जणुं कोणीतरी कुजबुजतंय : ब्रीफकेस उघड.
तो उघडतो.
त्यांत कैबेजचे कटलेट्स आहेत. पॉलिथीनच्या पारदर्शक पाकिटांत.
“हे माझे नाहीये!! कोणीतरी बदलली आहे!” कपितोनव उडीच मारतो.
“तुमच्याकडे काय आहे? तुमच्या ब्रीफकेसमधे काय घुसवलंय?”
“कटलेट्स! कैबेजचे!”
सगळे आपापल्या ब्रीफकेसेस उघडून बघतांत. पण कोणीच वैतागंत नाही, इतरांच्या ब्रीफकेसेसमधे सगळं ठीक आहे.
“माझ्या ब्रीफकेसमधून एक अत्यंत महत्वपूर्ण वस्तू चोरी गेलेली आहे,” कपितोनव सम्पूर्ण हॉलमधे घोषणा करतो, “अत्यंत महत्वपूर्ण वस्तू!”
“जर महत्वपूर्ण वस्तू आहे तर तिला शोधलं पाहिजे! माइक्रोमैजिशियन मक्रानोगव (‘ओले-पाय’ – अनु.) घोषणा करतो.
“महाशय!” श्याम-वन उठतो. “गिल्डच्या कौन्सिलच्या निवडणुकीच्या परिणामांनी कोणीतरी आधीच नाखुश आहे. त्या निवडणुकीच्या – जी अजून झालेलीच नाहीये, पण जी नक्कीच होईल!”
खुर्च्यांच्या मधल्या कॉरीडोरमधे एक ससा उड्या मारंत होता.
“माफ करा, हा माझा आहे!”
“कतोव्स्की, आपला फालतूपणा बंद कर!”
कतोव्स्कीच्या हातांत एक काळी चपटी वस्तू दिसते, जळक्या पैनकेकसारखी.
“आर्थर, माझ्याकडे!” पैनकेकला फरशीवर ठेऊन कतोव्स्की ओरडतो : ससा वळतो, आणि लगेच उड्या मारंत मागे येऊं लागतो.
बघतां-बघता पैनकेकची ‘उंची’ वाढू लागते आणि दर्शकांच्या डोळ्यांसमोरंच (सगळे लोक कतोव्स्कीकडेच बघताहेत) ते डोक्यावर घालण्याच्या वस्तूंत बदलतं, ज्याला बोलचालीच्या भाषेंत ‘सिलिण्डर’ म्हणूं शकतो.
कतोव्स्की सस्यासमोर सिलिण्डर ठेवतो, आणि तो फार काही विचार न करता, सिलिंडरमधे गायब होऊन जातो.
“माफ करा, माफ करा, असं करायचं नव्हतं,” कतोव्स्की वाकून वाकून म्हणतो.
सिलिण्डर जादुगाराच्या डोक्यावर दिसतोय, काही टाळ्या आणि हशा ऐकूं येतात. काही लोक उद्विग्न आहेत:
“कतोव्स्की, आपल्या फालतू ट्रिक्स बंद कर!”
“स्टाइल-बदलू!”
“आपला आयटम नाहीये!”
“मला लॉबींत करायचं होतं,” कतोव्स्की स्पष्टीकरण देतो. “संधि हुकली. मोठ्या मनाने माफ करून टाका.”
“इंटरवल होतोय,” अध्यक्ष घोषणा करतो. “अशाने काम नाही चालणार. नंतर बघून घेऊं. कॉफी-ब्रेक.”
11.51
कॉफी-ब्रेक. प्रवेश-हॉल.
कपितोनव ब्रीफकेस घेऊन उभा आहे आणि कॉफी पीत नाहीये. तो रागाने डेलिगेट्सकडे बघतो आहे. त्याला प्रत्येकांत शत्रू दिसतो आहे. लोक त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताहेत. ‘श्याम-वन’ स्वतः त्याच्याजवळ येऊन सांत्वना देत म्हणतो:
“तुम्हांला टार्गेट करण्यांत येत आहे, कारण की आम्हीं गिल्ड-कौंसिलसाठी तुमची उमेदवारी प्रस्तुत केली होती. तुम्हीं धीर धरा, आपण सगळं व्यवस्थित करूं, असं नाही सोडणार!”
“ह्यासाठी थोडा वेळ लागू शकतो,” जादुगार झाराप्योन्किन म्हणतो, “तुम्हीं फक्त येवढं लक्षांत ठेवा “प्रत्येका ट्रिकची एक काउन्टर-ट्रिक अवश्य असते.”
“माझ्या उमेदवारीमागे काय उद्देश्य आहे?” कपितोनव सर्द आवाजांत ‘तलाव’ला विचारतो.
“साइकोलोजिकल अटैक,” ‘तलाव’ त्याला उत्तर देतो, “लहानसा – तुमच्या-आमच्या विरोधकांवर. आम्हीं अगदी वेळेवर त्यांच्या खेळीचा बट्ट्याबोळ करून टाकला. तुम्हीं बघितलं नाही का, की जेव्हां मी तुमचं नाव प्रस्तुत करंत होतो, तेव्हां ते किती वैतागले होते? तुम्हांला त्रास होतोय? वर्तमान परिस्थितीत तुमच्या जिंकण्याचा काही चान्स नाहीये, आणि तुम्हांला स्वतःलासुद्धां बोर्डांत जायची इच्छा नाहीये, मी बरोबर म्हणतोय न? पण इफेक्ट...जबर्दस्त झाला, इफेक्ट.”
मिखाइल श्राम, वस्तू शोधणारा जादुगार जवळ आला:
“तेव्हां, हॉटेलमधे, तुम्हांला माझं म्हणणं ऐकायची इच्छा नव्हती, पण ब्रीफकेसतर उघडायला पाहिजे होती...”
आता कपितोनव ब्रीफकेसपासून दूर नाही होत आहे, तिला हातांत धरून ठेवलंय. ब्रीफकेस – कमीतकमी एक तरी प्रमाण आहे. कपितोनवची संदिग्ध नजर सगळ्या चेह-यांवरून घसरते, ह्या आशेंत की कोणत्यातरी गुन्हेगाराला शोधेल. पकडा-तर, प्रयत्न तर करा. नाही पकडूं शकणार.
कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेट्सचा मूड गेलेला आहे.
साधारण शिष्ठाचाराने, सीमेत राहूनंच बोलतात आहेत.
अधिका-यांमुळे, हवामानामुळे, जिगरी दोस्त आणि कॉम्रेडचा मुखवटा लावलेल्या माणुसकीच्या चलाख्यांनी वैतागून कोणी आपल्या कपांत चहाचं पैकेट टाकतोय, तर कोणी इन्स्टेन्ट कॉफीचा एखादा चमचा. बॉयलरमधून उकळतं पाणी कपांत टाकतो आहे.
प्लेट्समधून कोणी रस्क, कोणी वेफर्स, कोणी क्रीम-जैम बिस्किट्स उचलतोय.
काही लोक कपितोनवला ते दुर्दैवी कटलेट्स दाखवण्याचा आग्रह करतात, आणि जेव्हां पब्लिकचं मूड बघून तो पट्कन ब्रीफकेसमधे ठेवलेले कटलेट्स दाखवतो, तेव्हां लोकांना आठवतं की, असेच कटलेट्सतर बुफेच्या टेबलावर होते, आणि अनेक लोकांच्या प्लेट्समधून ते गायब झाले होते.
वराब्योव म्हणतो:
“आम्हीं तुमच्याबरोबर एकाच टेबलाशी बसलो होतो, आणि तुम्हांला, नक्कीच, ह्याबद्दल आठवतंय...मी समजतोय की तुम्हांला माझ्या प्रतिष्ठेबद्दल मनांतल्या मनांत शंका आहे, आणि मी ही घोषणा करतो, की एक तर माझा ह्या भानगडीशी काहीही संबंध नाहीये, उलंट, मी स्वतःसुद्धां कटलेट्सनी वंचित झाल्यामुळे, ह्या ट्रिकची निंदा करायला तयार आहे.”
“आणि मी आधीचं तिथून उठून गेलो होतो,” सीज़रने आठवण दिली. “तुम्हांला प्रामाणिकपणे सांगतो, मी माझं कटलेट खाऊन टाकलं होतं, पण त्याने काही फरक पडंत नाही. टेक्निकल पॉइंट ऑफ व्यूने बघतां, हे अगदी कठीण नाहीये – एकदम, म्हणजे, एकाच वेळेस, पब्लिकची एखादी लहानशी वस्तू खेचून घेणं. एखाद्या वेगळ्या परिस्थितीत मीपण हे करूं शकलो असतो, पण मी कधीच सगळेच्या सगळे कटलेट्स तुमच्या माथी मारले नसते.”
‘तलाव’ पुन्हां प्रकट होतो:
“चेहरा नको लटकवूं, लाडक्या! मी तुम्हांला खूष करतो. भेटा. नीनेल. तुमच्या प्रोग्रामची डाइरेक्टर. जसं मी प्रॉमिस केलं होतं. ही तुमच्या प्रोग्रामचं प्लानिंग करेल. मस्त राहील!”
“फार आनंद झाला, नीनेल,” कपितोनव सुमारे चाळीस वर्षाच्या महिलेला म्हणतो. “आणि तुम्हीं,” (‘तलाव’ला) म्हणतो, “दुस-या कुणाला कां नाही शोधंत, जो हा प्रोग्राम प्रोफेशनल पद्धतीने प्रस्तुत करूं शकेल?”
“तुमच्या शिवाय?” नीनेलला उपरोध कळला नाही.
“माफ करा, मला फोन करायचांय,” कपितोनव जिन्याने वर जातो.
तिथे तो खिडकीजवळ थांबतो, ब्रीफकेस खिडकीवर ठेवतो आणि विचार करूं लागतो की मरीनाला काय सांगेल. हिमकण पडतांत आहे, पण ते इतके कमी आहेत, की बर्फा सारखे वाटंत नाहीये. आणि, तेपण थांबून जातांत. कपितोनव ह्या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तयार नाहीये, की त्याला फक्त भास झाला होता, किंवा ते खरोखरंच पडंत होते. रस्त्याच्या दुसरीकडे त्याला कैफे दिसतो – लवकरंच त्यांना लंचसाठी तेथे घेऊन जातील.
त्याने ठरवलं की फोन नाही करणार – मेसेज पाठवून देतो:
“लहानशी समस्या. नोटबुक नंतर परंत करीन. सगळं ठीक आहे.”

