धनु कोष्ठक - १३
धनु कोष्ठक - १३
लेखक: सिर्ग़ेइ नोसव ; भाषांतर: आ, चारुमति रामदास
त्याच रात्री, किचनकडे जाताना (पाणी प्यावसं वाटलं) दाराच्या कोप-याला जोरदार टक्कर मारली. मी काही म्हटलंतर नाही, पण माहीत नाही कां, विचार करू लागलो - - : “कशाला?” अशाप्रकारे विचार करायला नको. विचार अशाप्रकारे नको करायला. लगेच उत्तर मिळालं, आणि विशेष गोष्ट ही होती - - : विचारांमधे - - :
“मृगजळ आणि चौकीदारांसाठी”.
भीतीने मी थिजून गेलो. मला माहीत होतं की हा कुणाचा आवाज आहे. तसं माहीत नाही, की हे कां माहीत आहे.
कदाचित, तो विचार करत असेल, की मी लगेच बोलायला सुरुवात करेन? नाही, मी चूप राहिलो. माझ्या चूप राहण्याने अप्रसन्न, त्याने हुकूम सोडला की मी बाथरूममधे जावे. आपल्या गुन्ह्याची मला जाणीव होती, म्हणून मी त्याचं म्हणणं ऐकलं.
त्याने मागणी केली की मी बोल्ट लावून दार बंद करावं. बंद केलं.
थोडा वेळ काही नाही झालं. मी बाथ-टबच्या किना-यावर बसलो होतो. मला एका मिनिटापेक्षांही कमी वाट बघावी लागली. बल्बच्यासमोर एक लहानसा कीडा आवाज न करता फिरंत होता - - : बादलीत घाणेरडे कपडे असल्याचं प्रमाण. मी स्वतःला आरशांत पाहिलं, मी आपल्यासारखाच होतो - - : म्हणजे, मूखिनसारखा. कीड्याची आठवण आली : “जणु पतंग”. मला वाटलं की तो चालला गेला. मी विचारलं - - :
“झालं?”
आणि तेव्हां सुरुवात झाली - - :
“मी तुला बाथरूममधे बंद करायला इथे नाही आलोय. मी इथे ह्यासाठी आलोय, की तुला नियमांच पालन करण्याच्या आवश्यकतेबद्दल चेतावनी द्यायचीय. तुला, कदाचित, समजलं नाहीये, की ही गंभीर बाब आहे. तर, लक्षांत ठेव. तू त्याचं उल्लंघन केलंय, ज्याचं उल्लंघन करायला नको. तू दोषी आहेस. तू असा दोषी आहे, जसा कुणीच नाहीये.”
चूप झाला. मला उत्तर द्यायचंय. पण, मला तर माहीत होतं, की मला आठवण दिली जाईल - - : जसं की इतक्यातंच मूखिनच्या बायकोशी बोलताना, मी न जाणे कां स्वीकार केलं होतं की मी कुणी मूखिन-बीखिन नाहीये. फक्त ह्याच एका गोष्टीसाठी माझी हत्या होऊं शकली असती. पण मी आपल्या मूर्ततेच्या आयामाबद्दल इशारासुद्धा केला होता - - : स्टेशनच्या रिफ्रेशमेन्ट रूमच्या परिचारिकेपासून देशाच्या प्रमुखापर्यंत. मी दोषी होतो.
“मी दोषी आहे” (मी आपला गुन्हा कबूल केला).
“दोषी? तुझ्या स्वीकारोक्तीने काय प्राप्त होणारेय? आणि प्लीज़, लाइट बंद कर.”
“हो, हे जास्त चांगलं होईल” (मी लाइट बंद केला).
अंधारांत त्याचा आवाज - - : जर ह्याला मानवी आवाज म्हटलं तर - - : आणखी जास्त घुमू लागला.
तुझी चूक दुरुस्त करणं माझं कर्तव्य आहे. आठवण करून देतोय - - : तुझ्या गतिमार्गाचा प्रत्येक बिंदु, तुझ्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण पूर्णपणे स्कैन केला जातो. तुझं काम आहे, प्रत्येक गोष्टींत मूखिनसारखं व्हायचं, जसं प्रकृति त्याला ओळखंत होती आणि ओळखतेय. तू स्वतःबद्दल वाट्टेल तो विचार कर, आम्हांला फक्त मूखिनमधे रस आहे, तुझ्यांत नव्हे. पुन्हां सांगतो, त्याच्यासारखा हो.”
आपल्या विचारांमधे मी त्याच्याशी सहमत झालो. कारण की तो विचारांतच मला ऐकू शकंत होता, वरून माझ्या डोक्यांत - - : तो तिथेच तर स्थित होता.
“काही शंका?” (माझ्या आंत विचारण्यांत आलं).
मी सुटकेचा श्वास घेतला. असं वाटतं की मला दोषी ठरवण्यांत आलं होतं. मी, मान्य करतो, की ह्याच्याहीपेक्षां वाईट गोष्टीची आशंका होती. ते सगळं, जे त्याने मला सांगितलं, त्याच्याशिवायसुद्धा मला माहीत होतं. मला माहीत नव्हतं का, की माझ्यावर दोषारोपण करण्यांत आलंय.
“हो, हो, बरेचसे प्रश्न आहेत! - - : ...मूखिनंच कां, कोणी दुसरं का नाही? कपितोनव कां नाही. कीर्किरोव, गायक कां नाही? मूखिन कोणच्या गोष्टींत श्रेष्ठ आहे?”
“कोणत्याच गोष्टींत श्रेष्ठ नाहीये. पण निवड करण्याच्या परिस्थितींशी तुझं काही घेणं-देणं नाही. निवड करण्याचा हक्क तुला नाहीये. आणखी काही विचार.”
“मूखिन मी काही दिवसांपूर्वीच झालो आहे. मूखिनच्या आधी मी कोण होतो?”
“हा काय प्रश्न आहे! तुला त्याने काय फरक पडतो, की तू कोण होता? आणि, तू होता तरी कां? विचारण्यासाठी तुझ्याकडे आणखी काहीच नाहीये कां?”
“बस, असंच - - “ हा असा मौका मिळालाय - - : सरळ तुमच्याकडून जाणून घेण्याचा - - :”
“थकबाकीसाठी ऐवजी वासरू” (संशोधक म्हणाला).
“???”
“अपंगाची सकाळ. आस-याच्या शोधांत, निर्वासितांची पाठवणी...विस्मृत आर्टिस्ट-पेरेद्विझ्निक25 निकलाय वसील्येविच अर्लोव. सत्यशोधक. की, तुला सत्यशोधक आवडंत नाहीत? आणि : तू चक्क प्योत्र पित्रोविच पदमर्कोव होऊं शकंत होता, तो पीन्स्क शहरांत मुलींच्या शाळेंत शुद्धलेखन शिकवायचा. आणि बोर्या गूरेविच, इंजिनियर आणि त्याच्या पहिल्या बायकोबद्दल, वलेंतीनाबद्दल काय वाटतं?”
“नवरा आणि बायको - - : एकाच वेळेस?”
“एकाच वेळेस कशाला? - - : वेगवेगळ्या कालखण्डांत. राहिला लिंगाचा प्रश्न, तर तो आमच्यासाठी
03.00
महत्वाचा नाहीये. तुझी रूपरेषा - - : विशिष्ठ मानसिक प्रकाराची आहे - - : आणि क्षेत्र - - : वर्तमान काळांत हे क्षेत्र आहे उत्तर-पश्चिम.”
मी दचकलो.
“काहीच आठवंत नाहीये - - : भूतकाळातलं.”
“जेव्हां हुकुम देतील, तेव्हां आठवेल.”
पुढचा प्रश्न विचारायच्या आधी विचारांना संयत करावं लागेल - - : “मला काय बराच काळ मूखिन म्हणून राहावं लागेल?”
“मला वास्तविक मूखिनला भेटणं आवडणार नाही. आशा करतो, की असं नाही होणार?”
संशोधक माझ्या डोक्यांत खोकला.
“वास्तविक मूखिन, जसं की तू समजतो आहेस, मेलेला नाहीये. तो थोड्या काळासाठी पर-अस्तित्वहीनतेच्या स्थितीत आहे...”
“पर - - : काय? - - : कोणच्या स्थितीत आहे?”
पर-अस्तित्वहीनतेच्या स्थितीत. पर-अस्तित्वहीनतेला घाबरू नको. पर-अस्तित्वहीनता पर-अस्तित्वाशी अश्या प्रकारे भिन्न आहे, जसं, उदाहरणार्थ, तू मूखिनपासून भिन्न आहे. पण तू माझं बोलणं मधेच तोडलं. तर, तुझ्या वैध मूखिनतेच्या सम्पूर्ण काळांत तो पर-अस्तित्वहीनतेच्या स्थितीत राहील. निश्चित वेळ आल्यावर मूखिन तुझ्या हातातून छडी घेऊन घेईल, जशी तू मूखिनची रिले-रेसची छडी घेतली होती - - : फक्त समानता दाखवण्यासाठी स्पोर्ट्सच्या क्षेत्रांतील उदाहरण देतोय. शारीरिक निरंतरतेची ग्यारण्टी आहे, तशीच, जशी परस्पर उपयोगाच्या सिद्धांताची ग्यारण्टी दिलेली आहे. मूखिनशी तुझी भेट - - : हा फालतूपणा आहे, ते अशक्य आहे, तुला धीर देतो. तसं, जर, कोणत्या विशिष्ठ बौद्धिक परिस्थितींवर लक्ष नाही दिलं तर - - :”
मी सतर्क झालो - - :
“म्हणजे कशा प्रकारच्या?”
“म्हणजे, अशा की, जणु तुम्हीं अगदीच दूर नाही झालांत. ह्याबद्दल विचार नको करू. भेट होणार नाही.”
“माझं मिशन काय आहे?” (संशोधकाला विचारलं).
“मूखिन होणं.”
“फक्त येवढंच? माझ्यावर कोणाची हत्या करायला तर जोर नाही ना टाकण्यांत येणार?”
“नाही, मूखिनतर माशी मारायच्या लायकीचासुद्धां नाहीये” (तो स्वतःच्या टिप्पणीवर हसला).
“रिपोर्ट्स लिहावे लागतील कां?”
“रिपोर्टची आवड आहे! - - : .... काय म्हणता! - - : स्वतःच विचारतोय! तू, ब्यूरोक्रैट, डोक्यांतून हा कचरा काढून टाक! - - : ...समजलं? ही काही ‘एलिएन्स’ची फिल्म नाहीये! - - : मग म्हणशील ‘ऑर्डर्स’! - - : म्हणशील ‘निर्देश! - - : “ऑर्डर फ्रॉम स्पेस! - - : (माहीत नाही का, त्याला ह्या विचाराने गुदगुद्या झाल्या - - : कोणाचा विचार? - - : “ऑर्डर्स फ्रॉम स्पेस’वाला; तो जोराने हसू लागला, पण हे हसू चांगलं नव्हतं). आता हेसुद्धा म्हण की तुला आवाज ऐकू येतात - - :”
मला समजलं नाही, की तो माझी परीक्षा घेतो आहे, की नुसतं मूर्ख बनवतो आहे.
“पण तुम्हीं - - : तुम्ही काय आवाज नाहीये?”
“मी - - : आवाज?! जर मी आवाज आहे, तर प्रकार गंभीर आहे. माझं अभिनंदन.”
त्याने आठ्या चढवल्या - - : मला भौतिक स्तरावर ह्याची जाणीव झाली - - : माझ्या चेह-याच्या स्नायूंद्वारे.
“फक्त नाटक नको करूस! आम्हाला हे आवडंत नाही! - - : नाही, मित्रा, नाटक नको करूस, तू पूर्णपणे स्वस्थ्य आहेस.”
“ह्यांत काही शंका नाही, की मी स्वस्थ्य आहे - - : पण तुमच्यातोंडून हे ऐकणं जरा विचित्र वाटतंय - - : ...तुम्हीं तर नाकारत नाही आपल्या - - : ...वास्तविकतेला?”
“माझं वैयक्तिक मत ऐकायचंय का? तर, ऐक, मित्रा, तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी सैतानांबरोबर, सगळ्या प्रकारच्या आत्म्यांबरोबर, काळा जादूवाल्यांबरोबर, डबल्सबरोबर, दूतांबरोबर, संदेशवाहकांबरोबर - - : ...हे सगळे डोक्याचे खेळ आहेत - - : असल्या प्रकाराचं साहित्य आहे, असल्या प्रकारचं...तू कुठे हा विचारतर करंत नाहीयेस ना, की तू आणि आम्ही तसल्याच डोनट्सची आशा करतोय? - - : बस, जास्त आ(शिवी) करायची गरज नाहीये! तुला समजलं?”
“पण - - : ...हा मी नाहीये - - : ...(मी विस्मित होतो) - - : हा तर - - : ...आत्ता-इतक्यांत - - :” (‘तुम्हीं’ जोडायला हवं होतं, पण मी आपली जीभ चावली - - : संशोधक, कदाचित, गोष्टींमधे वाहवंत जाऊ शकतो! - - : माझ्यासाठी हा एक आविष्कार होता).
जसं की डोनट्सची गोष्ट - - : हे कशासाठी?
मधेंच तो दृढतेने म्हणाला - - :
“तुझ्या तुलनेंत मूखिन एक सम्पूर्ण व्यक्ति आहे; मूखिन - - : सम्पूर्ण आहे; तो एक युनिट आहे; मूखिन - - : तुकड्यांमधे विभाजित नाही होऊ शकत! जेव्हां मी म्हणतो ‘मूखिन होणं’, तेव्हां माझा अर्थ आहे खरोखरंच ‘आपल्या सारखा राहा’. आम्हांला पाहिजे मूखिन सम्पूर्णतेत, परिपूर्णतेत. तुझ्याकडून केलेली कोणतीही हेराफेरी तुझा - - : तुला कळलंय, कुणाचा? - - : तुझा गुन्हा समजली जाईल. मी स्पष्टपणे समजावलं कां? आमच्यासाठी तू नाहीयेस, आहे तर फक्त मूखिन!”
“वाह, असं कसं! मी आहे, ह्याचांच अर्थ आहे, की मूखिन नाहीये!”
“मुद्दामहून वेड नको पांघरू (संशोधकाने म्हटलं). स्वतःला फार समजतोयेस. तू आहे कोण? मूखिनच्या शिवाय तू आहेस कोण? तू काय फक्त मैथेमेटिकल ऑपरेटर नाहीयेस? तू काय एका समुच्चयाच्या तत्वांच्या मधली अनुकूलता नाहीयेस? तू - - : कोणी नाहीये. तू मूखिनच्या विना नाहीयेस! तू नाहीये, मूखिन आहे! तू - - : मूखिन आहेस! आपल्या सीमेत राहा, मूखिन! मूर्खपणा करू नकोस! माझं म्हणणं ऐक!”
“कोन्स्तान्तिन! हे तू कोणाबरोबर बोलतोय?”
“हे कोण आहे?” (संशोधक उत्तेजित झाला).
“घोडा आहे कोटांत! (त्याने मला ताव आणूनंच दिला!) माझी बायको, मूखिनची बायको!”
“आ-आ - - : ...मरीनच्का - - : ...मग ठीक आहे, काही हरकत नाही - - :”
“कोस्त्या, तू लाइट कां बंद केलास? तू बंद कां झालायेस? तू तिथे करतो काय आहे?”
“तर, तू लाइट कां बंद केलास? तू बंद कां झालायेस? तू तिथे करतो काय आहे?” (बायकोची नक्कल करंत, उपहासाने तो माझ्याकडे वळला).
मला ह्यांत काही गंमत नाही दिसली. कदाचित त्यालापण समजलं की जरा जास्तंच करतो आहे - - : त्याने सांत्वना द्यायचं ठरवलं - - :
“मूर्खपणा. स्टैण्डर्ड सिचुएशन. आम्ही ह्याला ‘मीडियन’ म्हणतो. तू कधी मीडियनबद्दल ऐकलंय?”
“त्रिकोणांत - - : ती त्याला दोन भागांत विभक्त करते - - :”
“नाही. आम्ही मीडियनला वेगळ्या अर्थाने समजतो. मीडियन - - : ही, म्हणजे, जेव्हां तुम्हीं-आम्हीं वाद घालंत असतो, आणि कुणी तिसरा, बहुतकरून एखादी बाई, ऐकते आणि बेकारचे निष्कर्ष काढते, स्टैण्डर्ड सिचुएशन, मी म्हणतो. साहित्यांत आणि फिल्म्समधे भोक होईपर्यंत झिजलेला, असभ्यतेपर्यंत, तिथे डोनट्सने काम नाही चालंत”.
पुन्हां डोनट्सबद्दल.
“कोस्त्या, प्लीज़, दार उघंड, मला बाथरूमला जायचंय.”
“खोटं बोलतेय (संशोधकाने म्हटलं). तिला कुठेच नाही जायचंय”.
“बडबड बंद कर! (बायको ओरडली). मला घाबरवू नको!”
“तू काय बडबड करतोस? (संशोधकाने विचारलं). तू, काय कोणाला घाबरवतोस?”
“दार उघड, मी गंमत नाही करंत आहे!”
“व्वा-व्वा, जसं पाठ्य पुस्तकांत असतं.”
“कोस्या! काय दार तोडावं लागणारे, चांगला धडा शिकवीना!”
“काय ताकत आहे! (संशोधकाने म्हटलं). किती उत्साह आहे!”
मी स्वतःला आवरू नाही शकलो - - :
“कमेन्ट्सशिवाय काय काम नाही होऊ शकंत?”
आपल्या कमेन्ट्सनी मला वैताग आणला. हा स्वतःला समजतो काय आहे? परक्या घरांत, परक्या डोक्यांत!...मी बायकोला समजू शकतो, ती त्रासली आहे. जर ती अशी बाथरूममधे बंद होऊन, तिथे कुणातरी बरोबर गोष्टी करंत असती तर मी स्वतःपण त्रासलो असतो. मी शक्य तितक्या जोराने ओरडलो:
“घाबरू नको! लवकरंच उरकेन!”
शांतता पसरली. बायको, आणि तो, आणि मी शांततेला चाचपडंत होतो. आधी तो म्हणाला - - :
“मीडियनला अनेक प्रकारांनी निष्क्रिय करता येतं. आवाजाला कुजबुजण्याच्या स्तरापर्यंत कमी करता येतं. मोबाइलच्या संभाषणाची नक्कल करूं शकतो. हल्ला करणारे इलेक्ट्रिकल उपकरण चालू करू शकतो, जसं फैन. बहुधा मीडियनकडे लक्ष न देणं फायद्याचं असतं, पण हे थोडी हुशारी वापरून करायला हवं. तुझ्यासमोर सगळ्यांत मोठा धोका हा आहे - - : मेंटल हॉस्पिटलमधे घेऊन जातील; तिथेसुद्धां लोक राहतातंच. हे भयानक नाहीये.”
“मी वेडा नाहीये” (मी म्हटलं).
“आणि मी तुला काय सांगितलं? आपण स्वतःचीच पुनरावृत्ति करत आहोत.”
“जर तू पागल नाहीयेस (बायको ओरडली), तर लगेच बाथरूममधून बाहेर ये!”
मी ओरडलो - - :
“आत्तांच!”
“काही आत्तांच-बित्तांच नाही! (संशोधकाने थांबवलं). आपलं संभाषण अजून पूर्ण झालेलं नाहीये!”
पण तेवढ्यांत दार भयंकर चरमरू लागलं - - : तिने खालून काहीतरी घुसवलं होतं.
“न घाबरता! (संशोधक पट्कन बोलला). टेलिफोनचा उपाय - - : चल! शंभर टक्के ग्यारंटी”.
मला समजलं, मी ओरडलो - - :
“तुझं काय झाकंण-बिकणं उडालंय का? तू काय दार तोडायला निघालीये? मी फोनवर बोलतोय!...खूप ज़रूरी गोष्ट आहे, आणि तू आहे की सारखी डिस्टर्ब करते आहेस!”
आणि आम्ही दोघं, आणि दाराच्यामागे बायको - - : एकदम चूप, शांत आहोत, विचार करतो आहे; वाट बघतोय की शांततेला आधी कोण भंग करेल. मला संशोधकाच्या विजयाचा अनुभव होत होता, निःशब्द, शब्दांनी प्रकट न होणारा...मला हे बिल्कुल आवडंत नव्हतं. इथे मी काहीही ओरडलो, तरी मी होतो तर बायकोच्याच बाजूने - - : बायकोने नाही, तर ह्याने मला बाथरूममधे ढकललं होतं.
संशोधकाचा आवाज आधी निघाला, पण खूपंच हळू. कदाचित, त्याने हे म्हटलं होतं - - :
“ठीक आहे” - - : जर मी बरोबर ऐकलं असेल तर. पुढे - - : कुजबुज करंत - - : “तुझ्याबरोबर मूखिनच्या खतरनाक सवयींबद्दल चर्चा करायचीय, आणि सगळ्यांत आधी...”
मरीना - - :
“खोटं बोलतो आहेस, कोस्त्या. तुझा टेलिफोनतर टेबलावर पडलाय”.
तो रागाने गुरगुरला.
“ईडियट”. (मी आपला दुर्भावनापूर्ण आनंद लपवायचा प्रयत्न नाही केला. हुशार आहे. चांगला धडा शिकवला ह्याला. तेव्हांच पहिल्यांदा मी त्या ताकदींच्या अपूर्णतेवर विचार केला, ज्यांचं प्रतिनिधित्व तो करंत होता. धनु-कोष्ठकांच्या संरक्षक गुणांना मी तोपर्यंत नीट समजू शकलो नव्हतो, हे तर नंतर झालं, पण तेव्हां - - : मीडियनला लगेच बाजूला करायचं होतं.) आता पुढाकार मला घ्यायचा होता; मी आपला प्रस्ताव मांडला - - :
“मी सांगेन, की मी आपलं भाषण तयार करतो आहे. शनिवारी मेर्द्याखिनची ‘जुबिली’ आहे - - :”
“कुठला मेर्द्याखिन?! कसली ‘जुबिली’?! (संशोधक खूपंच तापला होता). ठीक आहे, बस! आजच्यासाठी इतकंच पुरे. मी मागणी करतोय - - : सिग्नल देशील”.
ह्या गोष्टीवर विश्वास कमीच होत होता, की मी त्याच्यांतील मागणीला अनुभवलं होतं, पण तरीही विचारल्याशिवाय राहू शकलो नाही - - :
“सिग्नल - - : ते काय आहे?”
“तू आपलं डोकं लढंव. आठव, ह्या शाल्यापिनला, रॉबिन्सन क्रूसोला - - : मग त्याला - - : ज्याने विमानाचा आविष्कार केला होता - - :”
त्याचं, जणु काही, स्विच-ऑफ झालं, पण ‘खट्’चा आवाज न करता. मी दीर्घ श्वास घेतला; हाताने स्विच चाचपडलं; लाइट लागला. मी बाथरूममधून बाहेर आलो.

