STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract Inspirational Thriller

4  

Anjali Bhalshankar

Abstract Inspirational Thriller

बाळा माफ कर

बाळा माफ कर

2 mins
404

शहीद इंद्र मेघवाल होय!तु शहीद झालास जातीयवादी हैवानांची शिकार झालास या धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या समानता एकता बंधुभावाचे गोडवे गाणाऱ्या देशाने,इथल्या व्यवस्थेने तुझा बळी घेतला एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची तयारी सुरू होती.धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारलाले सर्वात मोठे संविधान व लोकशाही गणराज्य असलेल्या गण तंत्र देशात दुसरीकडे शिरच्छेद सुरू होता तुझा आणि लोकशाहीचा सुद्धा. तूझी चूक काय तर तु घोटभर पाणी पिलास!पण बाळा ते निसर्गाने कसलाही भेदभाव न करता सर्वाना एकसमान न्यायाने दिलेले पाणी उच्च वर्णीय समजणाऱ्या,मानवजातीला कंलक असलेल्या मनुवादी वृत्तीच्या माठातले होते. ज्या माठाला तुझा हात लागला आणी ते पाणि अपवित्र झालं ते इतक बाटल की तुझ्या शरीरावरचे घाव आणि तुकडे त्या पुढे फिके पडले.आपल्या तनामनात भरभरून राहीलेले विषाचे पेले तुझ्या सर्वांगावर फटक्यांच्या रूपाने मोकळे केले गेले.तु आक्रोश करीत राहीलास फटकारे वाढतच राहीले.

तुझ्या घोटभर पाणि पिण्याच्या अक्षम्य अपराधापुढे तुझे मरण फिके पडले.एकविसावे शतक ज्ञान विज्ञान प्रगती तंत्रज्ञान अखिल मानव जातीचे संशोधन करताना जगातल्या कोणत्याही जातीच्या व्यक्तिच्या मरणानंतर सरळ रेषाच दिसते प्रत्येक व्यक्तिचे प्रोडक्शन बाईच्या गर्भातच होते.मेल्यानंतर प्रत्येकाचीच माती होते मग ते जाळून टाकू अथवा जमिनीत गाडून.हवा, पाणी ,सुर्य चंद्र कधीही भेदभाव करीत नाहीत मात्र इथला मानुस नावचा उन्मत्त अंहकार भेदभाव जातीयवाद,धर्मवाद कूळ पंत गोत्रच्या सूत्रात माणसालाच करकचुन बांधणार. इथं गाईला आई आणि कावळयाला बाप बनवून घास पक्वान्न भरवण्यासाठी कासावीस होणारे महाभाग माणसाने घोटभर पीले म्हणजे महापाप ठरवून मृत्यू दंडाची शिक्षा देतात.. आठ वर्षाच्या निरागस बाळ तु माठाला हात लावल्यावर पाणी बाटलं धर्म बाटला.मात्र तुला धर्माधांने हात लावला नी तुझं जन्माचं मातेर झालं आयुष्यच संपून गेलं.काय बदललंय हजारो वर्षात जग बदलले पण मानसाची मनं बदलीलीच नाहीत रे!जाती धर्म ऊच नीच काळा गोरा कुळ पंत गोत्रच्या गटारात बरबटलेले मानव नावाचे विषारी नाग आजही डुक धरून बसलेत.मेंदुत हदयातून विषाचे फवारे मारून बेचिराख करीत सुटलेत मानवालाच षंढ आहेत ते घोर अपराध ज्याला माफी नाही कधीही नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract