आजचा विषय -निसर्ग
आजचा विषय -निसर्ग
निसर्ग मानवाचा गुरू असतो. हिरवा निसर्ग साऱ्यांनाच भावतो. निसर्गातील पशुपक्षी, फुले, झाडे, नी त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे, भ्रमर हे निसर्गाची शोभा वाढवितात. रंगिबेरंगी फुले आपले मन मोहून घेतात. आकाशाचा निळा रंग, पाऊस पडताच त्यात होणारे बदल आपल्या मनात घर करतात. आपणही या निसर्ग रंगात रंगून जातो.
निसर्ग सर्वांचा खेळगडी आहे.सुंदर रंगांची उधळण करीत हा निसर्ग आपणास खुशी नि आनंदाचं देणं बहाल करत असतो.