Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Bharati Sawant

Others


2  

Bharati Sawant

Others


सरदार वल्लभभाई पटेल

सरदार वल्लभभाई पटेल

1 min 235 1 min 235

      महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे कार्य केले. सहाय्य केले आणि स्वातंत्र्योत्तर काळात एकसंघ भारत निर्माण केला. त्यांचे ऐतिहासिक कार्य पाहून भारतीय जनतेने त्यांना 'पोलादी पुरुष' आणि 'बार्डोलीचा सरदार' हे किताब बहाल केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म खेडा जिल्ह्यातील करमसद या गावी शेतकरी कुटुंबात झाला.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे प्राथमिक शाळेत एका कडक मारकुट्या शिक्षकाला वठणीवर आणण्यासाठी विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांनी तीन दिवस संप घडवून आणला. विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह जव्हेरबाईशी झाला. घरची गरिबी तेव्हा वकिलीची परीक्षा पास करून वकिली केली. पैसा साठवला.

    

  मोठे बंधू विठ्ठलभाई यांना पैसे देऊन इंग्लंडला पाठवले. ते बॅरिस्टर झाले १९०९ साली पत्नी वारली, तेव्हा ते कोर्टात केस लढवित होते आणि ते काम पूर्ण झाल्यावर ते घरी आले. यावरून त्यांची स्थितप्रज्ञता दिसून येते. मनिबेन पटेल त्यांची कन्या. नंतर ते इंग्लंडला गेले. बॅरिस्टरची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि अहमदाबाद येथे वकिली करू लागले. पैसा मिळाला पण महात्मा गांधींनी आपल्या सदाचरण आणि सात्विक प्रवृत्तीने त्यांना राष्ट्रसेवक म्हणून प्रवृत्त केले.अहमदाबाद शहराच्या नगरपालिकेचे अध्यक्ष झाले.१९४६ साली हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री नि नंतर उपपंतप्रधान झाले. भारतीय संस्थानिक व गोवा यांचे भारतात विलीनीकरण केले. असा हा खंबीर पण उत्कृष्ट संघटनप्रकाशक १५ डिसेंबर १९५० रोजी निधन पावला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झाले.


Rate this content
Log in