Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

हिंदोळा

हिंदोळा

1 min
448


सखी, आठवतो का तुला बालपणीचा झोपाळा? खेळायचो साऱ्याजणी खूप खेळीमेळीने. मस्ती, धाबडधिंगा यातच दिवस सरत असे. हिंदोळे घेतानाच पदलालित्यही दाखवायचो. सखी किती सुंदर ते जीवन! अमृततुल्य फळांचे मनसोक्त पान करताना जुळायचे मैत्रीचे रेशीम बंध... घरातून आलेली सादही कानावर पोहोचत नसे. एवढे मश्गुल असायचो क्रीडांगणावर.

     

समरसुन खेळणे, जीवापाड प्रेम करणे नि जीवाला जीव देणे या वाक्प्रचारांचे अर्थ नि संदर्भ त्याच वयात लागू लागले. झुळझूळ वाहणाऱ्या झऱ्यावाणी मैत्रीचे नाते उलगडत गेले. 'किती मरावं मैत्रीत' हेही त्याच वयात संशोधन झाले. मैत्रीची ही ढाल हरप्रसंगी उपयोगी पडायची.

    

तुझ्या माझ्या मैत्रीचे

आवळलेत घट्ट धागे

जपूया हे बंध रेशमी

होऊ प्रेमानेच जागे


मैत्री या नात्यातच समर्पण आहे. आठवते का गं सखी तुला? सायकलवरूनची आपली भ्रमंती. टवाळ पोरांची मस्करी... तुझे चिडणं, त्या मुलांना उपदेश सारं आठवतंय मला! आठवांचा हिंदोळाच जणू आज हेलकावतोय. तुझ्या रम्य आठवणींत रमून मी माझेपणच विसरलेय. बाल्यावस्थेत पोहोचलेय बघ...


Rate this content
Log in