Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prof. Shalini Sahare

Abstract Tragedy Inspirational

3  

Prof. Shalini Sahare

Abstract Tragedy Inspirational

युगांत मंगेशीचा

युगांत मंगेशीचा

1 min
205


आज अंत झाला एका युगांत स्वराचा

एका युगांत पर्वाचा , अजरामर वाणीचा


पहाटेच्या भूपाळीचा

आर्ततेच्या आळवणीचा

लय तालाच्या सुरीलतेचा

गानकोकिळा मंजुळतेचा

आयुष्याच्या प्रत्येक भावनेचा

रसाचा , गंधाचा , रसभंगतेचा


बालपणीच्या निरागसतेचा 

आईच्या माया, ममतेचा

तारुण्याच्या मादकतेचा

विजयाच्या औदार्याचा

विरहाच्या भावुकतेचा

प्रणयाच्या आतुरतेेचा 

राष्ट्रप्रेमाचा प्रखरतेचा

यौवनाच्या मुजोरीचा


प्रौढाच्या सामंजस्याचा

वार्धक्याच्या हतबलतेचा

अभिमानाचा, पराभवाचा

यशाच्या उन्मादाचा

पराजित संयमाचा


किती भावना किती कहाण्या

जन्माच्या आनंदाच्या

मृत्यूच्या दाहकतेच्या

तुझ्या गीतातील प्रत्येक भावनेचा


तुझ्या प्रत्येक गाण्याचा , रंगाचा

नवरसाच्या, रसलालित्याचा

स्वरांचा ,ओळीचा ,त्यातील भावनेचा

आयुष्यातील प्रत्येक क्षणी 

व्यापलेल्या लतादीदी तुमच्या

चैतन्यमयी अमृतस्वरांचा


दशदिशांत जिची ख्याती 

आज ती का अशी निःशब्द झाली

नियती ही अशी झाकोळली

तिच्या गाण्याची आस देवालाही लागली

मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे

म्हणत अनंतात विलीन पावली

युगांत झाला स्वरसम्राज्ञीचा

साश्रू नयनांनी तुम्हास आदरांजली

हृदयापासून तुम्हाला ही भावनांजली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract