यशोशिखर गाठतांना
यशोशिखर गाठतांना
यशोशिखर गाठतांना
कदाचित पडावे लागणार
पडल्यावर उठावे
उठून चालत रहावे
यशोशिखर गाठतांना
चांगले वाईट अनुभव येणार
वाईटातून खम्बिर बनावे
चांगले गाठीशी धरावे
यशोशिखर गाठतांना
मूर्ख शहाणे लोक भेटणार
मुर्खांना टाळावे
शहाण्यांचे ऐकावे
यशोशिखर गाठतांना
लोक आपले मत मांडणार
स्वमतावर खम्बिर रहावे
दृढनिश्चयावर टिकावे
यशोशिखर गाठतांना
दिवसाची रात्र करावी लागणार
नवीन तंत्रज्ञान शिकावे
विषयात पारंगत व्हावे
