* योग्यता *
* योग्यता *
वृत्त :- वैखरी
लगावली :- गागालगा गागालगा गागालगा
(तरही गझल)
*पटले न कोणाशी तरी पटवून घे*
*जगणे तुझे कैसे तरी उरकून घे*
आदरणीय *सुरेशजी भट*.. यांचा मतला.
( पटले न कोणाशी तरी पटवून घे, )
झाले किती तंटे तरी जमवून घे।।
कोणी कसे सांगे खरे खोटे असे,
त्यांच्या स्वभावातील गुण उमजून घे।।
मैत्रीत होते मस्करी केंव्हातरी,
मित्रांस अवघे आपले समजून घे।।
भेटी हव्या नाती जपूनी ठेवण्या,
प्रेमात त्यांना आपल्या बांधून घे।।
आपापल्या जागी उचित सारे जगी,
अंती स्वतःची योग्यता निरखून घे।।
