STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

येते तुझी आठवण.....

येते तुझी आठवण.....

1 min
28.6K


दिवस उजाडल्यावर, येते तुझी आठवण

दिवस मावळल्यावर, येते तुझी आठवण



क्षण एकांताचे, तुझ्या-माझ्या सोबतीचे

मोगरा दरवळल्यावर, येते तुझी आठवण



रूसून रूसून बाई मी, किती गं रूसू

गुलाब गाली हसल्यावर, येते तुझी आठवण



शांत मनाला थोडे, करावे अस्ताव्यस्त

मनाला ढवळल्यावर, येते तुझी आठवण



जपून ठेवली, तू दिलेली साडी अजूनही

ती साडी नेसल्यावर, येते तुझी आठवण



सांभाळून ठेवले जरी, कितीही मनाला मी

अवसान गळाल्यावर, येते तुझी आठवण



स्पर्श तुझा आजही, वाटतो हवाहवासा

अंग शहारल्यावर, येते तुझी आठवण



गुलाबी थंडीत लपेटून घेते, शाल अंगाभोवती

मखमली धुके दाटल्यावर, येते तुझी आठवण



माझ्या स्वप्नांवर, आजही तुझाच हक्क रे

स्वप्न तुझे पडल्यावर, येते तुझी आठवण



क्षण एकही नाही, जो तुझ्याशिवाय सरला

क्षण-क्षण संपल्यावर, येते तुझी आठवण



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational