STORYMIRROR

Aruna Garje

Children

3  

Aruna Garje

Children

येळ मले नाय

येळ मले नाय

1 min
207

जाय बाय जाय, साळला जाय

साळा बुडवून घरी राह्यन चांगल नाय


चिंगी रुसली, अंगणात जाऊन बसली

चिऊताई चिऊताई, थांब ना ग जरा

माझ्याशी आज खेळ ना ग जरा


नाय बाय नाय, बिल्कूल नाय

खेळायले मला येळच नाय

घरट्यात माझी पिल्लं दोन

चारापाणी त्यांना देणार कोण?


चिंगी उठली गोठ्यापाशी बसली

गाई गाई, तुझे हे चारा खाणं सोड

थोड्या वेळ माझ्याशी बोल गोड गोड


नाय बाय नाय, बिल्कूल नाय

बोलायले मले येळच नाय

खायला हवा हिरवा चारा

तेव्हाच येतील दुधाच्या धारा


चिंगी उठली, बागेत येऊन बसली

फुलपाखरा फुलपाखरा, थांब ना रे जरा

लपाछपी खेळ खेळू, आपण बागेत जरा


नाय बाय नाय, बिल्कूल नाय

लपाछपी खेळायले, येळ मले नाय

उमलली फुले, उडायचे आहे मला

भूक लागली खूप, मध हवा मला


चिंगी उठली, घरात जाऊन बसली

आजीमाय आजीमाय, डब्बा माझा भर

दप्तर घेऊन जाते, शाळेत भरभर


शाळेला गेली चिंगी कारण कळलं नाय

जातांना मात्र केले तिने बाय बाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children