STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Inspirational

4.4  

प्रतिभा बोबे

Inspirational

ये रे घना

ये रे घना

1 min
596


ये रे घना


उन्हाने रणरणत्या वणव्याने

तप्त झाली व्याकूळ धरणी

तू ये रे घना शमवण्या तृष्णा

कर रुसल्या धरणीची मनधरणी


जलाविना सृष्टी झाली किती कष्टी

बरस घना फुलवण्या हास्य तिच्या गाली

किलबिलतील पाखरे हर्षाने पुन्हा

येशील ना लवकर प्रतिक्षा खूप झाली


तुझ्या येण्याने फुलतील मळे

हिरवी किमया चौफेर पसरेल

भागेल भूक भाबड्या जित्रापांची

आगमन तुझे तहानल्या सृष्टीला हसवेल


ये रे घना तुझी आस लागली

बरस जोमाने देण्या नवचैतन्य

सुखावेल अन्नदाता सृष्टीचा बघ

तुझ्या येण्याने होईल तो धन्य


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational