STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

4  

Ashok Shivram Veer

Inspirational

ये, ऐक ना!

ये, ऐक ना!

1 min
320

ये,

ऐक ना !

खरं खरं सांगशील का मला ?

हे सारं कसं जमतं तुला ?

साऱ्यांचीच मर्जी राखायला,

अन त्यांना सांभाळून घ्यायला.


फिकीर नसते कधी तुला स्वतःची,

काळजी मात्र नेहमीच करते दुसऱ्यांची. 

हातात तुझ्या असे अन्नपूर्णा अशी,

राहते ना घरात कोणी कधीच उपाशी.


असे रुप तुझे साजिरे गोजिरे जरी,

भारी पडतेस तूच साऱ्यांना तरी.

न थकता वाहतेस साऱ्यांचे ओझे,

अन पार पाडतेस कर्तव्य तुझे.


अंगी गुण तुझ्या हा नम्रतेचा,

अवतार जसा तूझा दुर्गा मातेचा.

हाती नाही फक्त पाळण्याची दोरी,

शिकून सावरुन पुढे गेल्या नारी.


तरीही,

नेहमी एकच प्रश्न पडतो मला,

कसं हे सारंच जमतं तुला.

कसं हे सारंच जमतं तुला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational