याचना
याचना
तु नाही तर सारे बेचव आणि नीरस
मी चाचपतेय माझाच ठावठिकाणा
मला सोडलय जस त्रयस्थ ग्रहलोकी
अतृप्त भावनांना उधाण येतच नाही
गोड सुवासिक दरवळ लुप्त पावली
उरले ते फक्त भावना विरहीत मन
फरफट थांबेल माझी अस वाटत नाही
तीळ तीळ मरतेय मी एक काम कर ना
सारण तरी गोळा करून ठेव नदीकाठी
एकदाची निश्चितपणे श्वास घेईल शेवटचा
आनंद होईल तु निमीत्तमात्र असल्याचा
एक सेल्फी आठवणीत ठेव अंत्ययात्रेचा