आठवण
आठवण


कधी तरी पहाटे पहाटे मी निजावे
तुझ्या आठवणीच्या पहाऱ्यात मी उठावे
मुखात साखर घोळावी, चेहऱ्यात गुलाब फुलावे
तुझ्या आठवणींच्या रूपेरी-चंदेरी वाळूत लोळावे
मनाचे झुलारे झुलावे फुलांचे पसारे मांडावेत
मी मनोमनी तुझ्या आठवणीचे उसासे भरावे
का रे तू छळावे, कणकण मनमन मला झुरवावे
मी मात्र तुझ्या आठवणींना मनोऱ्यात सजवावे
सर्व हक्क राखून तुझे तुजपाशी राखीव ठेवावे
मग आठवणींनाही बंध-पाश का नाही तू लावावे