घात
घात
ठाऊक मज करशील अनपेक्षित घात
तरीही प्रीतिचे डोहाळे का बरं ?
अभिनय कला तुज पासून शिकावी
तुज जवळ ही ऐपत न्यारी
अपराधी तू ठरवतोस मज बिनदिक्कत
साक्ष का देशील विरोधात अन कशाबाबत
तरीही का करते काळजी स्मरणातही ?
का आहे मी सदैव तुज मोहपाशात
रचलेल्या पत्त्यांच्या मनोर्याला फुंकर घालून तुच पाडणार
तरी मश्गुल असतें मुळी तुझामाझा संसार थाटण्यात
जाणते अकल्पित कलाटणी देशील नात्याला
ठाऊक मज सारें तरीही प्रीतिचे डोहाळे...