अंगभर
अंगभर
येणारे शहारे ओल्याचिंब आठवणीचा उजाळा
निथळत अंगभर उतरू पाहणारे दवबिंदू
कधी ते मोकाट कधी ठाव मांडणारे
भरती येते सागर तीरावरी तस तसे
हेलकावे घेत बरसती आठवणी
किती ही नाहून धोऊन निघावे
या आठवणी ह्रदयातून कसे
बरें हद्दपार करावे काही
सुचना, अटी सांगा बरें

