तुच देवा वैरी माझा
तुच देवा वैरी माझा
तुच देवा वैरी माझा
सुख माझे तुलाच पाहवेना
सततची मरमर ईज्जतीची तारांबळ
काय गुन्हा असा क्षणीक सुख लाभेना
अफाट परिश्रम अनंत प्रयत्न
जाणले तु करवीतो तेच होतेना
काटेरी कुंपणात जीवाची तगमग
सोसवेना भार भावनाचा फरफट यातना
चेहर्यावरील हसू ही तुला पाहवेना
संकटांची सरबत्ती करून उडवी दैना
पुढ्यात मांडलेत दुःखाचे झरे
अश्रू अनावर हुंदका भरता येईना
कंटाळले देवा घे कवटाळूनी
आनंद लाभू दे तुझ्या तरी घरी