अपात्री दान
अपात्री दान
1 min
267
जिथे नाही कसली जान
तिथे करते अपात्री दान
कवडीमोल किंमत नाही
काम करून दमले ग बाई
नेहमीच समाधानाचा शोध
नशिबी शिव्याशापाचा भोग
कोणीच नाही करत पर्वा
तरीही चांगली वर्तणूक ठेवा
स्त्रीच्या भावना म्हटलं कीं
जसे येणारा जाणारा श्वास
जिथे कळतच नाही
तिथे उमगेल कसे??