अबोल वाट
अबोल वाट
या अशा सांजवेळी
सोनचाफा का पेरला गं
या गूढ वाटेवरी
गंधाळलेली पाऊलवाट
त्यात अवतरती स्वप्नं
अबोल वाटेत आज
तुला माहित आहे का??
पण मी ओळखतो गं
तुझ्या अनवाणी पाऊलखुणा
कोडं हे उलगडेल का सजणी
या अबोल वाटेवरी तुझं येणं
जसे माझ्या हृदयाला हादरे बसतात
भूकंपा परी

