या शहरात माझ्या(पद्य)
या शहरात माझ्या(पद्य)
गरीबा मिळतो सहारा
उद्योगाची कास धरा
मजूरास मिळतो रोजगार
सामान्यांस जगण्या आधार
मतभेद सगळे विसरून
संकाटावेळी येती धावून
जातपात नसते यावेळी
नांदे सुखी भूमंडळी
जागे अभावी मरण खाई
गरीबांस राहण्या जागा नाही
नियोजन असावे शहरांना
श्वास मोकळा जीवांना
प्रदूषणाचे जीवन शहराला
रोगराई मिळते जीवनाला
कष्टाचे आयुष्य जगण्याला
लाभे थोडेच मानवाला
वेळ आली आता, संदेश मानवाला
प्रदूषणमुक्त शहर करण्याला
एक तरी झाड असावे सोबतीला
हा मंत्र मानवाने, नित्य मनी वसावा
वृक्षाला जन्म देऊन पुण्य नित्य स्मरावा
स्वच्छ शहरे करण्याला
इच्छा अंतरी हृदयाला
मनी निश्चय ठाम असावा
परिसर स्वच्छ दिसावा
