व्यर्थ न हो बलिदान
व्यर्थ न हो बलिदान
स्वातंत्र्याचा दिन आला
वंदू आज तिरंग्यासी
आज फडके डौलाने
सार्थ हो बलिदानासी (१)
गुलामगिरीची जाण
क्रांतीकारकांच्या मनी
स्वातंत्र्याची नित्य आस
बालकांच्या ध्यानी मनी (२)
बाबूगेनू पुढे आला
तिरंग्यासी घेऊनिया
दुष्ट इंग्रजांनी त्याला
गाडीखाली मारुनिया (३)
स्वातंत्र्यवीरांनी दिले
प्राणांचेही योगदान
झाले शहीद आनंदे
देऊनिया बलिदान (४)
मनोमनी वंदू त्यांना
पाझरत्या नयनांनी
फडकतो झेंडा नभी
तयांच्याच बलिदानी (५)
जाण ठेवू नित्य मनी
भारताच्या सुपुत्रांची
व्यर्थ न हो बलिदान
श्रद्धांजली आसवांची (६)
