STORYMIRROR

manasvi poyamkar

Abstract Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Abstract Tragedy

वय झाल्यावर

वय झाल्यावर

1 min
27.4K


कालच सत्तरी ओलांडलीय मी

तेव्हा हे गणित समजते

तरुणपणात ज्या वयाचे गोडवे गातो

आज तेच वय नको नको होते

कारण

वय सरले की मान सरतो

अभिमान सरतो

सर्वांसाठी एक निरुपयोगी वस्तू होतो माणूस

कालपर्यंत अभिमान असणाऱ्या मुलांसाठी

आज मी झन्जट होतो

कालपर्यंत बापाचा मान देणाऱ्या

सुनेसाठी कटकट होतो

बायकोला निरर्थक वाटणारी

वटवट होतो

खाण्यापिण्याची बंधने येतात

तेल मीठ वर्ज्य होते

ज्या मुलाचे संगोपन करताना

रक्ताचे घाम वाहिले

औषधाचे पैसे भरणाऱ्या त्या मुलाच्याच

खर्चाचे कर्ज होते

वय झाल्यावर एक ओझं म्हणून उरतो माणूस

वय झाल्यावर एक अडचण म्हणून उरतो माणूस

वय झाल्यावर एक कटकट म्हणून उरतो माणूस

वय झाल्यावर न येणाऱ्या मरणाला झुरतो माणूस

वय झाल्यावर मान अभिमान सार सरत

एक निरुपयोगी वस्तू होतो माणूस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract