STORYMIRROR

Priti Dabade

Fantasy Inspirational Others

3  

Priti Dabade

Fantasy Inspirational Others

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

1 min
213

वटपौर्णिमेला सुवासिनी

करतात मनोभावे पूजा

वडाला समजतात पतीला

दीर्घायुष्य देणारा राजा


स्त्रियांसाठी आहे हा

फार खास सण

साजरा होई देऊन

धनधान्य आंब्याचे वाण


मिळावा हाच पती

प्रत्येक जन्मी

हाच ध्यास घेतला

आहे मनी


धागे बांधून वडाला

वाढवी पतीची आयु

विसरू नका झाडं

देतात प्राणवायू


तोडून फांद्या पर्यावरणाला

देऊ नका धक्का

पर्यावरण संवर्धनाचा 

विचार करा पक्का


करा संकल्प वटपौर्णिमेला

एक वडाचे झाड लावण्याचा

हीच पत्नी पुढच्या जन्मांत

स्वतःला मिळण्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy