वसुंधरा तुझे ऋण....
वसुंधरा तुझे ऋण....
वसुंधरा तुझे ऋण, कसे आम्ही व्यक्त करावे,
तू देतेस भरभरून, काय आणखी तुझ्याकडे मागावे
वसुंधरा तुझे ऋण, हाेऊ शकत नाही उतराई,
आज ओरबाडण्याची, आमची चालली नुसती घाई
वसुंधरा तुझे ऋण, आहेत तुझे थाेर उपकार,
दुसऱ्यासाठी जगण्याचा, देतेस तू संदेशवार
वसुंधरा तुझे ऋण, झाडे लावून आम्ही फेडू,
तुझ्याच साथीने जीवनात, आनंदाने आनंद वाढू