STORYMIRROR

Nagesh Dhadve

Inspirational

3  

Nagesh Dhadve

Inspirational

वेदना काही, सहन होईना!

वेदना काही, सहन होईना!

1 min
13.9K


जग बघुनिया झाले

वय भरूनिया आले

हाताशी हात उठेना

अंगाला अंग झुरेना

आता काही कळेना

वेदना काही,

सहन होईना!

दिस गेले होते आता ते,

आठवणी पलीकडचे,

मुले बाळे खेळत होती,

अंगावर जे,

हाक दिली होती मी,

लक्ष नाही का गेले,

आता थकलिया मी,

पुन्हा एकदा बघ ना रे!

ऐकू नाही येती,

तुज्या मनातले सारे,

न दिसती या डोळ्यातूनी,

आता जगातली पोरे

भरवूनिया हातातले

तुला दावायची तारे

लांब आता होउनी

आता विसरलास का रे?

आता जगतेया मी,

तुज्याकडे पाहून,

दिस संध्याकाळ होते,

तुज्या आठवणीत राहून,

श्वास घेतेया आता,

तुज्या नावातून मी,

डोळे बंद करेन,

तुला पाहूनच मी.

कळेल माजी व्यथा

म्हातारपण येऊन,

दुःख दिसेल तुला

हे आयुष्य झेलून

नाही कळायचे तुला,

माझे कालपण,

आयुष्य संपेल जेव्हा

तेव्हा आठवेल बालपण!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational