Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nagesh Dhadve

Others

3  

Nagesh Dhadve

Others

आई म्हणजे काय?

आई म्हणजे काय?

1 min
13.9K


आई म्हणजे काय??

तापलेल्या माथ्यावरी

मिठाची पट्टी ठेवणारी

तीच असते आपल्या

आयुष्याची आरोग्यमंत्री!!

 

आई म्हणजे काय??

स्वतः अनपढ असुनही 

मला धडे शिकवणारी

तीच असते आपल्या

आयुष्याची शिक्षणमंत्री!!

 

आई म्हणजे काय??

दोन घराची धुणीभांडी करून,

हक्काचं घर चालवणारी

तीच असते आपल्या

आयुष्याची गृहमंत्री!!

 

आई म्हणजे काय??

झोळीत दमडी नसून

मनाची श्रीमंती जपणारी

तीच असते आपल्या

आयुष्याची अर्थमंत्री!!

 

आई म्हणजे काय??

संकटात पाठीशी राहून

हातात हात देणारी

तीच असते आपल्या

आयुष्याची गुरुकिल्ली!!

 

- नागेश धाडवे


Rate this content
Log in