STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

पावसाचा ठसा!

पावसाचा ठसा!

1 min
2.7K


दाटलेल्या काळ्या
नभातून जन्म झाला
असावा,
त्या थेंबाचा
अन साथ घालावी
त्या थंडगार वाऱ्याने.!

नभामागून माघार
घ्यावा तो सूर्यकिरणांनी,
मान उंचावत पाहावं 
त्या रोपट्यांनी.....
आशेने!!

चिवचिवाट झाला 
तो पाखरांचा
अंधार पडूनी
युद्ध पुकारावे
त्या कडकडत्या विजांनी!!

अखेरेस,
जन्म होतो त्या
दवबिंदूचा,
पदरात निपटून घ्यावा
तसा गंध मातीचा!

धुके जे
जमले मनी
ते नि:श्वास झाले,
हृदयाला त्या गारव्याची
उणीव भासली!!

मन झाले मोकळे
या मातीच्या गंधातून
जन्म व्हावा असाच
या दवबिंदूचा,
अन उमटावा ठसा
या मनावर!!!

-नागेश धाडवे(ndd)


Rate this content
Log in