STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

सौन्दर्य फुलती स्वर्गावर!

सौन्दर्य फुलती स्वर्गावर!

1 min
2.6K


ओठांतले शब्द तुझे

उमटती हृदयावर

डोळ्यातली नजर तुझी

दाटे या मनावर

भाव तुझे चेहऱ्यावरचे

झुलती पानांवर

घायाळ करुनी रूप तुझे

सौन्दर्य फुलविते स्वर्गावर!

पायातले घुंगरू तुझे

रूमझुम करती कानावर

ओठावरचे रंग तुझे

मोह पाडती सौन्दर्यावर

गोड हसण्याने तुझे

आनंद खुले गगनात

घायाळ करुनी रूप तुझे

सौन्दर्य फुलविते स्वर्गावर!

गंध तुझा दरवळतो

मावळत्या स्वप्नांत

रूप तुझे दिसतां

कोवळ्या क्षणांत

चाल तुझी उमटते

विचारांतल्या स्मरणांत

घायाळ करुनी रूप तुझे

सौन्दर्य फुलविते स्वर्गावर!

असाच फुलूनी यावा

सौन्दर्याचा मळा तुझ्यात

प्रेमाचा मोहर पडावा

फुलत्या कळीचा माझ्यात

टिकून राहावे नाते

आपले एकमेकांवर

घायाळ करुनी रूप तुझे

सौन्दर्य फुलविते स्वर्गावर!

 

 


Rate this content
Log in