STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

3  

Nagesh Dhadve

Others

आई हविये! तुझ्यासारखी!

आई हविये! तुझ्यासारखी!

1 min
27.2K


आज पाहिलं तुझ्याकड

काय अवस्था ग तुझी

माझ्या सुखासाठी

किती धडपड तुझी

फाटकी जोडे तुझी

फाटकी तुझी सलवार

माझ्या पोट्यापाण्यासाठी

तुझ्या मागे का टांगती तलवार?

आई, नको मला असे सुख

ज्यास तुझ्या जगी दुःख

फाटका बरा मी

नको तुझ्या अंगी संकटाचे तीर

टोचती तुला काटे

जखम होई माझ्या मनाला

कसे झेलले दिवस तू

त्या कठीण क्षणाला

होय, मला आई हविये

तुझ्यासारखी अगदी तुझ्यासारखी..

छिद्रावली खिसे तुझी

माझ्या अपुऱ्या मागण्यांनी

पुरे होई तरी कसे

तुझ्या अर्धवट वेतनांनी

देवांची देव तू

माझ्या संकटांची छाया

तुझ्याच कुशीत मिळावी

आई-लेकरांची माया

शब्द पण लाजतील

गुणगान गाता तुझे

विसरणार नाही तुला

हे वचन तुला माझे

तुझे ओरडणे, बोलणे

समजत ग मला

शिक्षा देउनी मला कधी

तुला सोसतात कळा!

हातात बोट धरून

जग फिरवलेस मला,

त्याच हाताने साथ

जन्मभर देईन मी तुला

आई या शब्दाने

मला मिळतो आधार

तुझ्या शब्दविना

कधीच नाही माघार 

जग डुबले तरी

माया तुझीच राहे सदा

तुलाच अर्पण मी

हाच तुला वादा!

 


Rate this content
Log in