STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

हरवलेलं प्रेम!

हरवलेलं प्रेम!

1 min
2.7K


आज एकटच थांबवास वाटलं,

एकटं आणि एकांतामध्ये,

या अंधारात्मक आकाशामध्ये,

आणि मोकळ्या हवेच्या धुंदामध्ये.

कुठून तरी आवाज गुणगूणतोय,

माझाच तर नव्हे?

का या भोवतालच्या स्पर्शांचा?

हल्ली मन एकटच खेळतय, रमतय

असं का?

याच उत्तर माझ्याकडे पण नाही.

कोणीतरी आपुलकीने याच उत्तर विचारावं आणि याच उत्तर माझ्या

डोळ्यातल्या प्रेमातून तिला उमजाव.

थोडी भीती वाटते पण आनंद सुद्धा.

एवढ्या भावना हरवल्यात कदाचित प्रेमच असावं.

पण हे प्रेम खरंच तुला दिसेल का?

प्रेम आंधळं असत हे खरं आहे

कदाचित माझं सुद्धा असावं

म्हणून ते मला जाणवतंय,उमजतय!

पण मला विश्वास आहे....

माझं प्रेम आंधळं नसावं.

कारण ते दिसून अगदी नसल्यासारख..

उमजून पण न कळल्यासारखं...

एक बेधुंद हवा येते आणि तुझ्या स्पर्शाचा गंध देऊन जाते

अशा बेधुंद गंधाला मला माझ्यापर्यंत ठेवावस वाटत नाही.

असं वाटतं याचा आनंद आपण दोघांनी घ्यावा,

पण त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे..

तू देशील ना?

हा फक्त प्रश्नच न्हवे तर यात माझ्या आयुष्याच उत्तर दडलंय.

आणि ते उत्तर तू होय!!

हे उत्तर भेटलं तर आयुष्य किती

सुंदर होईल ना!

मी आयुष्य कापणार नाही,

तर फक्त जगेन!

माझ्या भावना तुझ्यापर्यंत न पोहचवता,

तुझ्या सहवासात राहिलेला प्रेमी!!

 

 


Rate this content
Log in