STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

3  

Nagesh Dhadve

Others

आईची व्यथा

आईची व्यथा

1 min
14.1K


बाळा, कुठे आहेस?

सोन्या! जरा मदत करतोस का?

म्हातारपणान डोळ भरून आलंय,

पायानं चालवनास झालंय,

एकतोस काय रं माझं?

आईसाठी एकदा येतोस का?

वेळ नाही कोणाकडं,

या  म्हातारीसाठी

जन्मास आलास तू,

झाले तुझ्यासाठी

विसरू नको रे

ते अंगावरचे दिवस

माझ्या जवळ ये बाळा

हेची देवाची नवस.

छिद्रावली खिसे माझी

फाटली जोडे

तापत्या उन्हात लेका

फुटली डोळे

तुझ्या स्वप्नापरी

गहाण झाले मी

विदेशी तू जाऊन

परकी झाले मी.

कुशीत माझ्या

तुला मिळायची स्वप्न

आई बोलताना

तूची होता माझा रत्न

एकटा पडलोया मी

पाणी कुणी पाजना

सुखात मरेन मी

बापाला या भेटना.

आई म्हणजे काय?

नाही कळायचे तुला

म्हातारपण येईल तेव्हा

सोसतील कळा

खांद्यावरचे दिवस आठवतील

का रे तुला?

शेवट माझा होउनी माझा

खांदा तरी देशील ना??

सूर्यास्त होईल माझा,

कर्ज संपेल या आईचं

जगडुबी होईल  तरी

नातं टिकाव आई-लेकाच

आज कळूनीया आले

अर्थ या आईचे

जगी आता कोण नाही

नातंच झाले स्वार्थाचे.

देव ही रडेल,

"आई" या शब्दाने

मढवून काढ या लेकांना

भुकेच्या नाण्याने,

पुण्य करावे, दान करावे

नको बापराया

वेळ सरली असेल

तेव्हा जग जाईल वाया.

गुणगान गाऊन

नाही कळे आईची व्यथा

स्वार्थी झाली पोर

हीच आई-लेकाची कथा

दिसावं तसं नसावं

हेच आपुल  जग

किती ढोंगी झाले नाते

देवा आता तूच बघ.

आई असे आपुल्या

आयुष्याची मंत्री

स्वतःच खचून तीच

जगाची राजकारणी

गृहमंत्री, शिक्षणमंत्री

आरोग्यमंत्री, अर्थमंत्री

हीच ती "आई"

तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली!


Rate this content
Log in