धुके
धुके
1 min
6.6K
धुक्यांतले ओलेचिंब
थेंब,
स्पर्शावुनी फुलांतल्या
कळीला,
अन अलगद पांघरून घ्यावे
जसे,
नाते होते सातापलिकडल्या जन्मातले...
अंधारातून जन्म घ्यावा
सूर्यकिरणांनी
अन कोवळ्या किरणांतूनी
हाक गुंजावी,
त्या गारव्यातल्या थेंबाने
नजरेतून डोकावूनी पहावं
हा सौन्दर्याचा स्वर्ग
उनाड वारा त्यास
साद मातीच्या गंधाचा
फुलून यावे दाही दिशा
जन्म व्हावा पाखरांचा
जन्मोजन्मी आगमन
व्हावे असेच हिमऋतूचे
अन असेच रंग फुलावे
मातीतल्या नात्यांमध्ये
- नागेश धाडवे(ndd)