STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

0  

Nagesh Dhadve

Others

तू तिथे मी!

तू तिथे मी!

1 min
699


तुझ्या आठवणीतल्या

स्वप्नांना

तुझ्या डोळ्यातल्या

जगाला

साथ असे माझी

तुझाच होऊन मी

तू तिथे मी!

 

तुझ्या जगातला

राव मी

तुझ्या सुखातला

रंग मी

भेट राहील सदा

तुझाच होऊन मी

तू तिथे मी!

 

तुझ्या नावातला

अर्थ मी,

तुझ्या नजरेतील

लक्ष मी,

छंद वाटे मला

तुझाच होऊन मी

तू तिथे मी!

 

आयुष्य हवे

ते तुझ्यातले

संपुनिया जग

ते माझ्यातले

शेवट तुझ्यातला

तुझाच होऊन मी

तू तिथे मी

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन