Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Inspirational Others

3.8  

Sarika Jinturkar

Inspirational Others

वसंत ॠतु

वसंत ॠतु

1 min
286


पूर्व दिशा उजळली  

लाली गुलाबी आभाळी दाटली  

पसरले सप्तरंग अंबरी 

पितांबर जणू झळकती क्षितिजावरी  

पहाटेचा मंद वारा 

आणि बहरल्या दिशा दाही  

वसुंधरेने नवा पेहराव घातला

नभ धरेने स्वागत केले  

"ऋतुराज" वसंताचे उत्साहानी


आला वसंत, पानगळ होऊन  

निष्पर्ण असलेल्या झाडाला एक नवी ओळख मिळाली

इवल्या-इवल्या पानांना नव्या येणाऱ्या पानांसाठी 

नवी उमेद जागली

 जुनेपणावर पुन्हा एकदा नवेपणाची झालर चढली  

वृक्षवल्लींनी मरगळ झटकली

 चैतन्याची नवी पालवी फुटली  


निसर्गाच्या उत्सवाची जणू सुरुवात झाली  

अंगणी फुलला मोगरा 

शुभ्र सुवासिक 

 बाग सजली विविध फुलांनी झाली सुशोभित

 वसंत ऋतु, अनुपम 

सुगंध पसरला अलौकिक  


गुलमोहर निष्पर्ण तो 

लाल फुलांनी सजला  

पळसही आपल्या 

विविध रंगानी नटला  

गुलाबी गारठा ओसरू लागला 

 मोहरली आमराई, बहरली 

 कोकीळेला ही उपवनात मधुर सुरांची साथ लाभली  


प्रसन्न वाटते मना ऐकता 

हे निसर्ग संगीत 

किती विविधता,अन्  

रंग संगती, रंगीत 


हिरवे हिरवे रान,त्याच्या कुशीत निजणारे निळसर पाणी,आनंद आनंद चहुकडे अन् 

 पाखरांची मधुर गाणी


 वसंत, नवा सोहळा सृष्टीचा 

नव सौख्य पालवीचा 

विविध रंगाची उधळण करणारा

 सुंदर रम्य देखावा  

डोळे भरून पाहावा..  

किती ऋतू आगळा अन् वेगळा  

वाटले आज 

काय शिकावे आपण या बहरण्यातून, कोकिळेच्या गाण्यातून.....?

 विपरीत परिस्थितीत संयम

 जी राहणार नसते कायम  

सुखदुःखात सदैव आनंद,

 सकारात्मकता  

कारण 

ऋतू असती हे असेच अवखळ येती आणि जाती

 सुखदुःख असते क्षणिक असेच मानवाच्या जीवनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational