वसा
वसा
आंधळ्या अंधारातुनी चालू रे कसा
खेळ हा नियतीचा मी खेळू रे कसा
साई रामा तुझा मी घेतला वसा
आंधळ्या अंधारातुनी चालू रे कसा ।।धृ।।
बुद्धी शक्ती युक्ती देवा दे रे मला
पाप मुक्त भक्ती देवा करू दे मला
उतणार नाही मातणार वर लाभू दे मला
घेला वसा टाकणार नाही सूर लावू दे मला ।।१।
कर्तव्याची कामं सारी करू दे मला
सात फेऱ्यांची ही गाडी ओढू दे मला
उतणार नाही मातणार नाही वर लाभू दे मला
घेतला वसा टाकणार नाही सूर लावू दे मला ।।२।।
नाम तुझे घेता देवा रमू दे मला
धाम तुझे पहाता देवा नमूं दे मला
उतणार नाही मातणार नाही वर लाभू दे मला
घेतला वसा टाकणार नाही सूर लावू दे मला ।।३।।
