STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

वर्षाऋतू

वर्षाऋतू

1 min
308

झडझड आषाढाची सरताच...

आल्या श्रावणाच्या सरी....

रिमझिम झरताती....

उन्हं हळदुले धरेवरी......

नभी गोफ सप्तरंगी......

इंद्रधनूचा विराजे.....

वसुंधरेचा साज हिरवा.....

हिरवाई खुलूनी साजे......


घननीळ बरसतो.....

नद्या धबधबे वाहती.....

प्रपातांचे शुभ्र पाणी.......

तुषार ये अंगावरी.......

मंद वा-याची झुळुक

कुंदवात दरवळे......

चैतन्य फुले पानोपानी.......

सुगंध पसरे चहूकडे.......

रिमझिम धारांमधे.......

तन मन सुखावेलं........

ऊन पावसाचा खेळ......

मधुमीलन उमलेल.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract