वृक्षमित्र
वृक्षमित्र
झाड लावून करू संवर्धन
वाचवू या मानवी जीवन
डोलताना वृक्ष रुबाबात
पाहू या आपण पुढच्या काळात
धोक्यात आहे जीवन
वन्यजीव पशूपक्ष्यांचे गण
धूप वाढून तप्त जमिनीची
नापिक होऊन स्थिती दुष्काळाची
समस्या वाढते प्रदूषणाची
गरज आहे वृक्षलागवडीची
वृक्षतोडीची समस्या वाढली
बेसुमार कत्तल झाडांची झाली
परिणाम झाला पर्यावरणावर
पाऊस पाणी हवामानावर
वृक्षामुळेच सारे मिळते
जनजीवनही सुरळीत होते
पोसणारे निसर्गाचे स्वरूप
गरजा भागविणे मानवाचे खूप
चला करू या वृक्षारोपण
आणि करू या त्यांचे संवर्धन
