वृक्ष
वृक्ष
एक झाड लावू मित्रा
त्याला पाणी घालू
त्याला पाणी घालू मित्रा
खत घालून वाढवू
खत घालून वाढवू मित्रा
त्याची निगा राखू
त्याची निगा राखू मित्रा
त्याच्या सावलीत खेळू
त्याच्या सावलीत खेळू मित्रा
त्याची फळं चाखू
त्याची फळं चाखू मित्रा
त्याच्या बिया जपून ठेवू
त्या बियांची परत आपण
वृक्षलागवड करू मित्रा
वृक्षलागवड करू......
पर्यावरणाला हातभार लावू
पर्यावरणाला हातभार लावू मित्रा
आनंदाने सर्व मिळूनी वृक्षसंवर्धन करू.....