STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Tragedy Others

4  

Sumit Sandeep Bari

Tragedy Others

वनवास

वनवास

1 min
605

एक महान राजा नाव त्याचे दशरथ,

त्यास पुत्र चार राम, लक्ष्मण,शत्रुघ्न आणि भरत.


चारही पुत्र एकमेकांचे जीव की प्राण,

पण मंथराने भरले कैकयीचे कान.


कैकयीने आपल्या पुत्रास बनवण्यास राजा,

प्रभू रामांना दिली वनवासाची सजा.


कैकयीच्या हट्टापायी मिळाला वनवास,

प्रभू रामांच्या संगती लक्ष्मण बनुनी दास.


चांगले जीवन मंथराने केले भंग,

वनवासात प्रभू रामांना आले कठीण प्रसंग.


वनवासाचे फार कठीण होते जीवन,

त्यात सितामायेचे झाले अपहरण.


इकडे तिकडे फक्त दिसत होते रान,

प्रभू रामांना भेटले महाबली हनुमान.


महाबली हनुमानाच्या मदतीने सोडवले सीतामायेस,

प्रभू रामचंद्रांच्या नशिबी कसा हा वनवास.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy