Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

वंशज्योत...

वंशज्योत...

1 min
336


आई ऐ आई ,ऐक ना ग म्हणणे माझे :

जन्मआधीच कसे होते तुला माझे ओझे?


आई, माझ्या येण्याने लागे लक्ष्मीची चाहूल;

जशी धरा तशी जननी बनून ठेवीन घरी पाऊल.


वंशाचा 'दिवा' म्हणून मुलगाच तुला हवा;

होऊनी "वंशज्योत" मी रचेल इतिहास नवा.


आई,मी नसता कसा पेटेल तुझा वंशाचा 'दिवा'

वात बनून घडवेल मीसुद्धा जिजाऊंचा "शिवा"


आई,मी शृंगारात यामिनी, प्रणयरसात कामिनी;

उद्याचे भविष्य उद्धारणारी मीच तर दामिनी.


आई, मी स्वरांची सरस्वती, जीवांची धरित्री;

ज्ञानाचे बाळकडू पाजणारी मीच सावित्री.


आई, घेऊन तुझा वसा, मी वाचावीन ही अवनी;

कन्या- बहीण- पत्नी- आई बनून नाती फुलवीण जीवनी.


आई, मी तुझ्या गर्भातील कळी, मला उमलू दे;

'स्त्रीभ्रूण हत्या' पाप आहे, हे जगाला कळू दे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational