वंश
वंश
या वंशातला दिवा
विझेल ना एकादा जिवा
समजून घे आता तरी
मारु नको त्या परी
पणती जळते देवापाशी
उजेड पडतो घरापाशी
मुलगी म्हणजे प्रेम करणारी ताई
मुलगी म्हणजे लाडाणे मारणारी आई
समजून घ्या बाई
का कळत नाही काई
आई म्हणून बनते पहिला गुरु
तिच असते खरी कल्पतरू
सांग बाबाला मान दादाला
आम्ही सुद्धा त्यातलेच
दुसऱ्या नाही जातीतले
एकदा कळेलच
तिच्या मुळे रस्ता वळेलच
घराला शोभा येते मुलीने
जसे फुलातल्या कळीने
