वंदन...
वंदन...


करु वंदन भारतमातेला, या तिरंगी ध्वजाला
या देशासाठी दिले बलिदान, वंदन त्या हुतात्म्यांना...
इंग्रजांची होती सत्ता, आपल्या या देशावर
पर्वा न करता जीवाची, लढले ते शूरवीर...
दिले स्वातंत्र्य आम्हा मिळवून, वंदन त्या शूरवीरांना..
घरदार संसाराची, पर्वा नाही केली
लढता लढता झेलली, छातीवरती गोळी...
त्यांच्या कार्याची, त्यांच्या शौर्याची प्रेरणा कोटी जनांना...
त्या शुरांच्या बलिदानाने, स्वातंत्र्य हे मिळाले
शेवटी मानली हार त्यांनी, भिऊन इंग्रज पळाले...
गातो पोवाडे त्या वीरांचे, मिळे आम्हा प्रेरणा...
टिळक, नेहरू, आगरकर, गांधी, गोखले, सावरकर
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कित्येक गेले फासावर...
त्या शूरांना, क्रांतीविरांना , वंदन अमर हुतात्म्यांना...