STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

वंदन कर्तृत्वाला

वंदन कर्तृत्वाला

1 min
245

रांधा वाढा उष्टी काढा

नारी कालची कामात

कामाविण कुठल्याच

नसे ती व्यवधानात    (1)


बुद्धिमान तरी नसे

तिज संधी शिक्षणाची 

घर ही लक्ष्मणरेषा

काढलेली तिच्यासाठी   (2)


कष्ट त्याग अपमान

जिणे अवहेलनेचे

बोलायची पण चोरी

ओठ जणू शिवलेले    (3)


फुले दांपत्याने केले

शिक्षणाचे दार खुले

शिक्षणाने सिद्ध केले

स्थान बुद्धिमत्तेतले    (4)


हळूहळू सर्व पदे

तिने केली पादाक्रांत

बरोबरीमधे नाही

मागे उरलाच प्रांत    (5)


नारी आजची गेलीय

समानतेच्याही पुढे

निर्णयक्षमता तिची

श्रेष्ठतम सिद्ध आहे   (6)


वंदनीय जगताला

नारी ही कर्तृत्ववान

सन्मानाने गौरवाने

वाटे सर्वां अभिमान   (7)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational