STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

वजन

वजन

1 min
341

कठीण कठीण कठीण किती

वजन घटणं बाssई

कठीण कठीण कठीण किती


पथ्याचा सुंदरसा

चार्ट बनविती

सूप सँलड नित घेता 

जिलबीही तोडितीsss

कठीण कठीण कठीण किती 


जाउनिया जिममधे

घाम गाळिती

परि काटा नच हलता

पथ्य मोडितीsss

कठीण कठीण कठीण किती 


पनीर आणि दूधाचा

रतिब लाविती

अन जीव्हा खवळताच

तुटून जेवितीsss

कठीण कठीण कठीण किती 


मेदपरिघ आटविण्या

कँलरी मोजती

येता परि मेजवानीस

चापून जेवितीsss

कठीण कठीण कठीण किती 

वजन घटणं बाई 

कठीण कठीण कठीण किती!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract