STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

विस्तव...!

विस्तव...!

1 min
28.5K


विस्तव धगधगता

उरात घेऊन

सीमेवर तैनात


एकच सदैव

देशभक्तीचा

भाव मनात


थंडी वारा

उन्हाळा पावसाळा

सारे ऋतू समान


मातृभूमीचा

सदा उंचवितो

आम्ही सन्मान


सक्षम संरक्षण

हेच लक्ष अन

हीच आमची शान


धगधगत्या

अग्नी सोबत

आम्ही गातो गुणगान


तीक्ष्ण नजर

तीक्ष्ण कान

सदैव राखतो भान


संरक्षणाची

सांभाळतो आम्ही

जोखमीची कमान....!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational