STORYMIRROR

Bharati Sawant

Abstract

3  

Bharati Sawant

Abstract

विषय - सारे काही सत्तेसाठी

विषय - सारे काही सत्तेसाठी

1 min
193

आम्ही करूच घोटाळे 

तुम्ही आता ते निस्तरा 

पाठवू त्याचा मोबदला

नाहीतर उचला बिस्तरा


तुम्ही जगा आम्ही जगतो 

घ्या मोबदला बसा चुपचाप

कार्यकर्त्यांनाही जगवतो 

बघा गुंडांकडून लागे चाप


खुर्ची आम्हां सर्वात ही प्रिय

त्याहूनि श्रेष्ठ अजून काय हवे 

खुर्ची आहे म्हणुन सत्ता आहे 

पैशापुढे जमती चमच्यांचे थवे 


आमच्या ढेरपोटाला नका हसू

तुमचे गेलेले असें ते खपाटीला 

आम्ही तुम्हांवर मग रुसून बसू 

मत दिले नाहीत तर आम्हांला


सगळे टेंडर आम्हीच भरणार

ऑफिसरही आमच्या खिशात 

तुम्ही फक्त सहीच करणाऱ्यांत

नकाच हासु तुम्ही या मिशात


म्हणूनि आम्हांला निवडून द्या

पाच वर्षे आमची चाकरी करा 

आमच्या कायद्यात राहत चला

घरदार तुमचे धनधान्याने भरा


कशासाठी सात पिढ्यांसाठी

सत्ता आहे म्हणून फेकतो शिते

सगळेच हे खुर्चीच्या सत्तेसाठी

पैसा फेकूनच ही जमतील भुते


द्या आम्हांला आताच निवडून

दणक्यात पार्टी करू दारू पाजू

हात जोडतो आम्हीं अधूनमधून

मते मागायला मी कशाला लाजू


कार्यकर्ते पळतील सदा मागेपुढे

चंपाबाईच्या बैठकीत सरंजामाचा 

रातीला मुजरा घेऊच चंपाबाईचा

कालच दिला तिला हार लाखाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract